BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ ऑक्टो, २०२२

सोलापूर रेल्वे स्थानकावर तरुणीचे बेधुंद खळखट्याक !


शोध न्यूज : सोलापूर येथील रेल्वे स्थानकावर एका तरुणीने जोरदार हैदोस घातला असून तिने लोखंडी रॉड हातात घेवून विश्रांती कक्षात बेधुंद खळखट्याक केले त्यामुळे प्रवाशांत मोठा गोंधळ उडाला. 

आज सकाळच्या वेळेस प्रवासी आपापल्या रेल्वेची प्रतीक्षा करीत असताना एक तरुणी तेथे बसलेली होती.  तिने अचानक जोरदार धिंगाणा सुरु केला. सोलापूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील उच्च श्रेणी वेटिंग रूमच्या काचा फोडायला सुरुवात केली. हातात एक लोखंडी रॉड घेऊन ती बिनधास्तपणे काचा फोडू लागली. तिच्या या अचानक सुरु झालेल्या खळखट्याक प्रकाराने अन्य प्रवासी गोंधळून गेले. तोडफोड करीत या तरुणीने उच्च श्रेणी वेटिंग रूमच्या सगळ्याच काचा फोडून टाकल्या. तेवढ्यावर ती शांत बसली नाही तर नंतर तिने तेथील खुर्च्यांची देखील मोडतोड सुरु केली. 

अचानक सुरु झालेल्या या प्रकाराने प्रवाशांत एकच खळबळ उडाली . वेटिंग रूमच्या काचा फोडून काचांचे तुकडे ती प्रवाशांच्या दिशेनेही भिरकाऊ लागली. आधीच गोंधळून गेलेले प्रवासी तेथून बाजूला गेले. काही अंतरावर उभे राहून काही प्रवासी तिच्या या 'राड्या' चे मोबाईलमध्ये चित्रण करीत राहिली पण तिच्याजवळ जाण्याचे अथवा तिला थांबविण्याचे धाडस कुणाचेही झाले नाही. काही वेळेनंतर मात्र पाच सहा जणांनी तिला पकडण्याचे धाडस केले.  तिच्या हातात लोखंडी सळई होती आणि तिच्या साहाय्याने ती बेधुंद प्रहार करीत होती. या घटनेत सुदैवाने कुठल्याच प्रवाशांना काही इजा झाली नाही परंतु एक वेगळीच अफरातफरी माजली. प्रवाशांना काही इजा झाली नसली ती या तरुणीच्या पायाला मात्र जखम झाली आहे.  

 सदर तरुणी ही या ठिकाणी कशासाठी आली हे मात्र समजू शकले नाही. तिला कुठलाही प्रवास करायचा नव्हता त्यामुळे ती केवळ येथे बसून होती. स्थानकावर रेल्वे आली की प्रवाशी ये जा करीत होते. अशा वेळीच ती अचानक संतापली आणि तिने काचा फोडायला सुरुवात केली. काही वेळेनंतर या तरुणीला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या तरुणीचे नाव राजनंदिनी साठे असल्याची माहिती मिळाली असून ती मनोरुग्ण असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. लोहमार्ग पोलीस ठाण्यात तिला नेल्यानंतर पोलिसांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती शांत होत नव्हती. या तरुणीला चहा देण्यात आला परंतु तिने तो चहा देखील भिरकाऊन दिला. 

मनोरुग्ण की ....?
सदर महिला मनोरुग्ण आहे की तिने कुठल्या मानसिक त्रासातून हा प्रकार केला याचा तपास पोलीस करीत आहेत. सदर महिलेवर कायद्यानुसार कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या तरुणीचे राहणीमान उच्च होते आणि आरपीएफ पोलीस जेंव्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होते तेंव्हा ती त्यांच्याशी अत्यंत उद्धटपणे बोलत होती. 

व्हिडीओ व्हायरल !
या तरुणीचे खळखट्याक सुरु होते त्यावेळी काही जण मोबाईलमध्ये हे चित्रण करीत होते . तरुण बेधुंद होऊन काचांची तोडफोड करीत होती. (Young woman vandalized at Solapur railway station) या घटनेचा व्हिडीओ काही वेळातच प्रचंड व्हायरल झाला त्यामुळे सदरची घटना नेमकी कशी घडली हे लोकांना पहायला मिळत आहे. 



 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !