BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ ऑक्टो, २०२२

घरात घुसला दहा फुटाचा 'जहरी' किंग कोब्रा ! व्हायरल व्हिडीओ



झाडाझुडपातून जाताना कुठून तरी साप येतोय काय ? ही भीती मनात असते पण साप थेट घरातच घुसला तर ...? कल्पनाही सहन होत नाही पण एका घराच्या किचनमध्येच विषारी साप घुसला, हा साधासुधा साप नव्हता तर तो चक्क अति विषारी आणि तब्बल दहा फुट लांबीचा कोब्रा होता. 


साप म्हटलं की कुणाच्याही अंगावर काटा येतो, केवळ चित्र पहिले तरी मनात भीती उत्पन्न होते. साप समोर दिसला तर पळता भुई थोडी कशाला म्हणतात याचा अनुभव येत असतो. छोटा मोठा साप समोर आला तरी भीतीने गाळण उडते. अलीकडे तर हे विषारी साप माणसांच्या निवासाच्या ठिकाणी देखील आश्रयाला येऊ लागले आहेत. ते कधी घरात घुसतील आणि कुणाला दंश करतील याचा काहीच नेम राहिला नाही. अनेकांच्या दुचाकी वाहनात देखील हे साप लपून बसलेले असल्याचे काही व्हिडीओ आपण पहात असतो. सोशल मीडियामुळे असे अंगावर काटा आणणारे अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यामुळे हा विषारी प्राणी आपल्या किती जवळ आणि आपल्या किती नकळत येत असतो याची सहज जाणीव होऊन जात असते.  


शेतातील वस्तीवर राहणाऱ्या कुटुंबाना तर सदैव अशा विषारी प्राण्यांचा धोका असतो. वस्तीवर झोपलेल्या मुलांना विषारी नागाने दंश केल्याचे आणि यातच त्यांचे मृत्यू झाल्याचे काही दुर्दैवी प्रकार देखील समोर आलेले आहेत. शहरी भागात देखील विषारी नाग थेट घरापर्यंत येवू लागले आहेत. सद्या तर पावसाचे दिवस असल्यामुळे असे प्रकार वाढीला लागलेले आहेत. बिळात, वारुळात मुक्काम ठोकणाऱ्या या प्राण्याच्या घरात पावसाचे पाणी गेले की ते सैरावैरा होऊन आश्रय शोधत धावतात आणि थेट घरात येवून बसतात. असाच एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून एक कोब्रा थेट एका घरात किचनमध्ये घुसला आणि अवघ्या कुटुंबाने श्वास रोखला. हा साधासुधा साप नसून अत्यंत विषारी असलेला किंग कोब्रा असून तो ही तब्बल दहा फुट लांबीचा आहे.


साक्षात मृत्यू थेट घरात आणि किचनमध्ये आल्याचे कुटुंबाच्या लक्षात आले आणि प्रत्येक जण घाम पुसू लागला. या यमराजाने घरात प्रवेश केल्याचे लक्षात येताच घरातील सगळे जीव वाचविण्यासाठी घराबाहेर पळाले. दहा फुटाचा किंग कोब्रा थेट घरात घुसल्याची उदाहरणे तशी दुर्मिळ आहेत. ज्या घरात तो घुसला होता त्या घरातील प्रत्येकाची बोबडी वळली होती. काय करावे हाच प्रश्न पडलेला होता. कुटुंबातील एकाने मात्र प्रसंगावधान राखत तातडीने सर्पमित्राला बोलावले, सर्पमित्र धावत धावत आला पण त्यालाही हा कोब्रा सहज पकडता येईना. किचनमध्ये तो असल्याने सामानांची बरीच अडचण होत होती त्यामुळे मोठ्या प्रयत्नाने त्याला पकडावे लागले.  


दहा फुटांच्या किंग कोब्राला घरातून पकडणे हे काही सोपे काम नव्हते पण कौशल्याने त्याला पकडून जेरबंद करण्यात यश आले. ३६ सेकंदाचा हा व्हिडीओ धडकी भरवणारा आहे. (A ten-foot cobra entered the house! Viral video) हा साप पकडण्यासाठी आधी त्याला काठीने डिवचून बाहेर काढण्यात आले आणि त्याची शेपटी पकडून बाहेर ओढण्यात आले. त्यानंतर पुढील थरारनाट्य समोर आले. NowThis नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ मोठ्या संख्येने पहिला जात आहे. पहा हा व्हिडीओ ! (व्हिडीओ पाहण्यासाठी खालील ओळीवर टच करा )  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !