BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ नोव्हें, २०२३

पंढरपूर तालुक्यात होणार नाही दिवाळी ! सरकारचा दुखवटा पाळणार !!




शोध न्यूज : पंढरपूर तालुक्यातील एका गावात दिवाळी साजरी केली जाणार नसून, दिवाळीच्या या सणात सरकारचे सुतक पाळले जाणार आहे. मराठा आरक्षणासाठी एक वेगळ्या प्रकारे शासनाचा निषेध केला जाणार आहे.


मराठा आंदोलनासाठी अवघा मराठा आक्रोश  करीत आहे, मराठा आरक्षणासाठी राज्यात आंदोलन पेटले असले तरीही, या आंदोलनात समाजातील विविध जाती धर्म उतरले आहेत. मुस्लिमांसह विविध जाती एकवटल्या असून,  मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी करीत आहेत. काही मुस्लीम लोकप्रतिनिधींची आपल्या पदाचे राजीनामे देवून शासनाचा निषेध केला आहे तर अनेक गावात मुस्लीम युवक, मराठा आंदोलन उपोषणात सहभागी झालेले आहेत. या आंदोलनात कसलाही जाती भेद दिसत नाही पण शासन मात्र स्थितप्रद्न्य असून, केवळ त्याच त्या बाता मारण्यात आणि चालढकल करण्यात समाधान मानताना दिसत आहे. मराठा योद्ध मनोज जरांगे पाटील यांनी आपला जीव डावावर लावला आहे, शासन मात्र त्यांच्या जीवाशी खेळताना दिसत आहे. राज्यभर आंदोलनाची धग जाणवत असतानाही, शासन सकारात्मक असल्याचे कुठेच दिसून येत नाही, त्याचा राग मराठा समाजासह संपूर्ण महाराष्ट्रात जाणवत आहे.


मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आजवर अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत, या तरुणांच्या आत्महत्येने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. तिन चाकांचे सरकार मात्र केवळ उघड्या डोळ्यांनी हे सगळे काही पहात आहे. समाजमनात या सरकारच्या विरोधात आक्रोश आहे, हा आक्रोश आगामी निवडणुकीत प्रतिध्वनित होण्याचीही शक्यता आहे पण तोपर्यंत महाराष्ट्राचे किती नुकसान होतेय याचीच भीती आहे. सत्तेसाठी आणि आपली खुर्ची टिकविण्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेले नेते, मराठा आंदोलकांचे अश्रू पुसण्यासाठी मात्र पुढे येताना दिसत नाहीत त्यामुळे राजकीय नेत्यांच्या बाबतीत जनतेत प्रचंड राग उफाळून आला आहे. शासनाच्या नावाने तर शिमगा सुरु आहे पण, सरकार आपलीच पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानत आहे. अखेर पंढरपूर तालुक्यात या सरकारचे सुतक पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऐन दिवाळीत हा दुखवटा पाळला जाणार आहे.


पंढरपूर तालुक्यात गावोगाव शिंदे फडणवीस सरकारचा निषेध करण्यात येत आहे. आजवर नेत्यांच्या आणि सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन होत आले आहे, प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आल्या आहेत पण आता, थेट सुतक पाळून निषेध केला जाणार आहे. (Diwali will not be held in Pandharpur taluka) पंढरपूर तालुक्यात गावोगावी उपोषण केले जात आहे आणि मराठा आरक्षणाची मागणी केली जात आहे, पंढरपूर तालुक्यातील देगाव येथे मात्र, दिवाळी साजरी न करता, ऐन दिवाळीत सुतक पाळून शासनाचा निषेध केला जाणार आहे. दिवाळीपर्यंत शासनाने मराठा आरक्षण न दिल्यास दिवाळीत सरकारचे सुतक पाळले जाणार आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !