BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ नोव्हें, २०२३

मनोज जरांगे खरे ठरले ! पंढरपूर तालुक्यातून सत्य आले समोर !

 




शोध न्यूज :  मराठा आरक्षणासंदर्भात मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी केलेला दावा अखेर खरा ठरला असून, पंढरपूर येथे देखील पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या दाव्यातील सत्य देखील पुढे आले आहे.


मराठा आरक्षणाची मागणी लाऊन धरलेले मनोज जरांगे पाटील यांनी, महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी शासनाकडे केली आहे. शासनाने मात्र याला नकार दिला असून, न्या. शिंदे यांची समिती नेमली आहे आणि जुन्या पुराव्यांचा शोध सुरु केला आहे. या समितीने निजामकालीन पुरावे मिळविण्यास सुरुवात केली असून, पुरावे शोधण्यासाठी या सामितिने हैद्राबाद देखील गाठले. काही हजारावर पुरावे देखील या समितीला मिळाले असून, समितीच्या शिफारशीनुसार नोंदी आधालालेल्याना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात देखील केली आहे.  मनोज जरांगे पाटील यांनी मात्र याला विरोध करून, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी लावून धरली आहे. कुणबी आणि मराठा हे एकच असल्याचे सांगितले जात असतानाही, काहींनी मात्र कुणबी आणि मराठा हे वेगवेगळे असल्याचे दावे पुढे रेटले आहेत. 


मराठवाड्यातील कुणबी वेगळे आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच अन्य भागातील मराठे वेगळे असल्याचे दावे देखील करण्यात येत आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्रात देखील मराठा हेच कुणबी असल्याचे, कागदपत्रावरून आता समोर येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही मंडळीनी आधीच कुणबी प्रमाणपत्र घेतले असल्याचे दिसून आले आहे. ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे ते देखील मराठाच आहेत. परंतु आता पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या पंढरपूर तालुक्यात देखील मराठा आणि कुणबी एकच असल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी केलेला दावा हा पूर्णपणे सत्य असल्याचे दिसत आहे.   पश्चिम महाराष्ट्रात  देखील मोठ्या संख्येने कुणबी दाखले सापडू लागले आहेत. पंढरपूर तालुक्यातील  भोसे या गावात  कुणबी दाखल्यांची नोदं असल्याचं समोर आलं आहे. जुनी कागदपत्र तपासात असतांना ही मोठी बाब समोर आली आहे. 


महाराष्ट्रातील मराठा एकच आहे आणि तो कुणबी आहे असे सांगत जरांगे पाटील यांनी जुने रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली होती. त्यानुसार जुनी कागदपत्र पडताळणी केली जात असताना, ही मोठी माहिती समोर आली आहे. पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे अशा प्रकारच्या २५ पेक्षा अधिक नोंदी आढळून आल्या आहेत. मराठा अशी नोंद असलेल्या मराठा बांधवांच्या पूर्वजांची नोंद मात्र 'मराठा कुणबी' अशी असल्याचे या कागदपत्रावरून स्पष्टपणे समोर आले आहे. भोसे येथील शाळेत १८८५ पासूनच्या नोंदी असलेली कागदपत्रे मिळाली आहेत. यात १८०० ते १९०० या दरम्यानचे मोडी लिपीत असलेले दाखले मिळाले असून नंतरचे दाखले मराठी भाषेत लिहिलेले आहेत.  यात अनेकांचे दाखले कुणबी म्हणून आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठे देखील कुणबीच आहेत याची पुष्टी झाली आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील जुन्या कागदपत्रांची संपूर्ण तपासणी होणे आता अत्यावश्यक बनले आहे.


मनोज जरांगे पाटील यांनी देखील अशीच मागणी केली होती. मराठवाड्यातील कुणबी दाखले हेच पुरावे मानून, मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणून दाखले दिले जावेत असा आग्रह जरांगे पाटील यांनी शासनाकडे केलेला आहे. शासनाने देवू केलेले अर्धवट दाखले वाटण्यास त्यांनी विरोध केला आहेच शिवाय, ज्यांना असे दाखले दिले त्यातील काहींनी हे दाखले जाळून देखील टाकले आहेत. (Evidence in the Kunbi Maratha, Pandharpur Taluk) सरसकट दाखले देण्याच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम असून त्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे. सरकार आणि समिती मात्र पुरावे शोधण्यात वेळ घालवत आहे. अशा परिस्थितीत पंढरपूर तालुक्यात सापडलेले हे पुरावे प्रचंड बोलके आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !