BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ नोव्हें, २०२३

आगामी ४८ तासात अवकाळी पाऊस झोडपून काढणार !

 



शोध न्यूज : हवामान खात्याने आता पुन्हा एक अंदाज दिला  असून पुढील ४८ तासात राज्याच्या अनेक भागात पाऊस झोडपून काढणार असल्याचे सांगितले आहे.


पावसाळ्यात पावसाने दगा दिला आणि त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत त्यामुळे येणारा उन्हाळा हा टंचाईचा आणि संकटांचा असल्याचे संकेत आधीपासूनच स्पष्ट झाले आहेत. चार महिने आभाळाकडे डोळे लावले असतानाही पावसाने कृपा केली नाही आणि आता मोसमी पाऊस परत गेल्यानंतर अवकाळी मात्र हजेरी लावू लागला आहे. गेल्या चार पाच दिवसानापासून ढगाळ हवामान आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही परिस्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळेच राज्याच्या काही जिल्ह्यात वादळी वारे आणि अवकाळी पाउस बरसत आहे. आणखी काही दिवस अवकाळी पाउस सुरूच रहाणार आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.



पुढील ४८ तासांचा हवामान अंदाज देताना, विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा पाऊस झोडपून काढणार असल्यामुळे पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन देखील हवामान विभागाने केले आहे. मागील दोन दिवसात राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावलेली आहे. वेगवान वादळी वारे वाहात असल्यामुळे काही ठिकाणी झाडे देखील कोसळली आहेत.  पुढील ४८ तासात देखील मुसळधार पाऊस झोडपून काढणार आहे त्यामुळे वेळीच काळजी आणि दक्षता घेणे आवश्यक बनले आहे. हवामान खात्याने राज्यातील  काही जिल्ह्यांना पुढील ४८ तासांसाठी यलो अलर्ट देखील दिला आहे. 


सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली  या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून मुंबई, पुणे ठाणे आणि पालघरसह अनेक जिल्ह्यात हा पाऊस होईल असे हवामान विभागाने म्हटले आहे. (Meteorological department forecast of unseasonal rain) मराठवाड, विदर्भातील काही जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील ४८ तासासाठी हा अलर्ट दिला गेला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !