BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ नोव्हें, २०२३

कुणबी - मराठा एकच ...... ढीगभर सापडले पुरावे !

 


शोध न्यूज : सरकारचा शोध वेगाने सुरु असतानाच, कुणबी आणि हे मराठा एकच असल्याचे ढीगभर सापडले पुरावे आढळून येत असल्याने, मराठा आनंदित झाला असून, शासनाने आतातरी मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र द्यावीत अशी मागणी होऊ लागली आहे.


मराठ्यांना ओबीसी सवलती मिळण्यासाठी कुणबी प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. मराठा आंदोलक सातत्याने मराठा समाजास सरसकट प्रमाणपत्र देण्याची मागणी करीत आहेत पण शासन जुन्या कागदांच्या आड दडू लागले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रामाणिक आंदोलनानंतर सरकारला देखील घाम फुटला असून, गावोगावी कुणबी प्रमाणपत्र आढळून येवू लागली असल्याने, शासनाने राज्यभर मोहीम राबवली आहे, प्रत्येक तालुक्यात जुन्या नोंदी तपासण्याचे काम वेगाने सुरु आहे आणि तितक्याच  वेगाने प्रत्येक ठिकाणी कुणबी नोंदीचे पुरावे आढळून येत आहेत. त्यामुळे मराठा हाच कुणबी आणि कुणबी हाच मराठा असल्याचे समोर येताना दिसत आहे.


इतिहासाचा अभ्यास करणारे अनेक अभ्यासक ऐतहासिक पुराव्यासह सांगत आहेत, कुणबी आणि मराठा एकच असल्याच्या ऐतिहासिक नोंदी दाखवत आहेत पण त्याकडे लक्ष दिले जात नाही. विनाकारण कुणबी आणि मराठा असा घोळ राज्यकर्त्यांनी घातला असताना, आता त्यांच्याच शोध मोहिमेत ढीगभर पुरावे आढळून येऊ लागले आहेत, त्यामुळे कित्येक वर्ष या गरीब कुणबी मराठ्यांना सवलतीपासून दूर ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. चांगली गुणवत्ता असूनही प्रवेश मिळत नाही, नोकरी मिळत नाही आणि कमी गुणवत्तेच्या तरुणांना मात्र सगळे काही मिळते या नैराश्यातून अनेक मराठा तरुणांनी आपले जीव दिले आहेत. आता तेच कुणबी ठरत असतील तर या मृत्यूला आणि त्यांच्या कुटुंबियांची दुर्गती होण्याला जबाबदार कुणाला धरायचे ? असा सवाल आता उपस्थित होत आहे. 


प्रत्येक तहसील कार्यालयातील तपासणीत कुणबी मराठा नोंदी आढळून येत आहेत , विशेष म्हणजे, शिरूर तहसील कार्यालयात केवळ तीन दिवसांत १४ हजार ६०० नोंदी आढळून आल्या आहेत.    शिरूर तहसील कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या विशेष कक्षात तीन दिवसांपासून जुन्या नोंदी तपासल्या जात आहेत.  गाव नमुना नंबर १४ मधील अधिकाऱ्यांनी १ लाख ३९ हजार  नोंदी तपासल्या. त्यात १४ हजार ६०० इतक्या नोंदी आढळून आल्या. हे काम मोठ्या गतीने चालू आहे. राज्यातील विविध  जिल्ह्यांमध्ये कुणबी नोंदी शोधण्याचं काम वेगाने सुरु झाले आहे. प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या कामातून किती कुणबी नोंदी सापडल्या याची जिल्हानिहाय आकडेवारी समोर आली  आहे. प्रत्येक तहसीलमध्ये जुनी कागदपत्र पडताळणी केली असता, विविध भाषेत असलेल्या कुणबी मराठा  अशा नोंदी आढळून येत आहेत. या नोंदी पाहता बोलके पुरावेच  समोर येताना दिसत आहेत.


 राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक 57 हजार 688 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात 45 हजारापेक्षा जास्त नोंदी सापडल्या आहेत. तर धुळे जिल्ह्यात 31 हजार 453 नोंदी सापडल्या आहेत. सागंली जिल्ह्यातूनही माहिती समोर आली असून दहा लाख अभिलेखे तपासले असता 2211 नोंदी कुणबी मराठा असल्याच्या आढळल्या आहेत. या नोंदी बहुधा मोडी लिपीत असल्यामुळे मोडी जाणणाऱ्या अभ्यासकांची तपासणीत मोठी मदत होत आहे. लिप्यंतर सोफ्टवेअर तसेच मोडी किरण पुस्तकाची देखील या मोहिमेत मोठी मदत होत आहे.


कोकणात कुणबी नसल्याचे तारे काहींनी तोडले होते पण रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील भूमी अभिलेख कार्यालयात कालही कुणबी नोंदी आढळल्या आहेत. (Evidence of Kunbi Marathas was found in every taluka)  सगळ्याच तालुक्यात अशा प्रकारच्या नोंदी आढळून येत असल्याने, कुणबी आणि मराठा हे एकच आहेत हे दिसू लागले आहे, कुणबी आहेत पण जुन्या नोंदी आढळून येत नसतील तर त्यांना वंचित ठेवले जाणार काय ? हा सवाल देखील उपस्थित होऊ लागला आहे.


सोलापूर जिल्ह्यात सहा हजार 

सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात मिळून आत्तापर्यंत ६ हजार नोंदी आढळून आल्या आहेत. कुणबी नोंदी तपासण्याचे काम वेगात सुरु असून, दिवाळीत देखील हे काम सुरूच राहणार आहे. तपासणीत महसूल, शालेय, जन्म मृत्यू तसेच इतर शासकीय विभागातील जुन्या कागदपत्रांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे जातीने या तपासणीकडे लक्ष देत आहेत. तपासणी कशाला ते सतत भेट देत असून मराठा कुणबी नोंदी अभिलेखात कशा पद्धतीने तपासाव्यात, तसेच मोडी लिपीत मराठा कुणबी शब्द कशा पद्धतीने आहे, याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी  माहिती दिली आहे. नागरिकांना देखील जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले असून कुणाकडे जुनी कागदपत्र असतील तर त्यांनीही या मदत कशास माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठी भाषा व मोडी लिपी भाषेतून मराठा कुणबी नोंदणी आढळून येत आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !