देवाच्या पंढरीत साहेबालाच घातली 'टोपी' !
संतांचा वावर असलेल्या विठ्ठलाच्या पंढरीत चोरट्यांचा प्रताप नेहमीच पहायाला मिळत असतो. आता तर एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यालाच या चोरांनी हात दाखवला आहे. पोलीस अधिकाऱ्याला चोरांनी टोपी घालण्याचा पराक्रम केल्याचे समोर आले आहे.
देवदर्शनासाठी पंढरपुरात आलेल्या बारामती येथील सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या चार चाकी गाडीची काच फोडून चोरट्यांनी १७ हजारांची रोकड लंपास केली. याचबरोबर काच व गाडीतील इतर साहित्याची तोडफोड करून २० हजार १८५ रूपयांचे नुकसान केल्याचा धक्कादायक प्रकार येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडला.
भगवान सोपानराव खारतोडे (रा.बारामती, जि.पुणे) हे नुकतेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावरून निवृत्त असता गाडीची मधल्या शीटच्या चादरी प्लेडने कापून ठेवल्याचे त्यातील पैसे चोरीस गेले असल्याचे झाले आहेत. यानिमित्त श्री विठ्ठल-रूक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी ते कुटूंबीय व इतर नातेवाईकांसमवेत आपल्या चार चाकी वाहनाने (एम. एच. ४२ / बी.ई. ६८०८) पंढरपूर येथे पोहोचले होते. त्यांनी आपली गाडी छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या बाजुला लावली. त्यानंतर सर्वजण दर्शनाला गेले.
निवृत्त अधिकारी जेंव्हा परत गाडीजवळ आले तेंव्हा त्यांना गाडीची काच फुटलेली असल्याचे दिसले. त्यांच्या गाडीतून अज्ञात चोरट्यांनी ब्रीफकेस लंपास केली असून, या ब्रीफकेसमध्ये १७ ह्जार्र रुपये होते. गाडीचे देखील दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. (Theft from the car of a retired police officer) गाडीतून चोरून नेलेली ब्रीफकेस, चळे एस टी त आढळून आली परन्तु त्यातील डोकड मात्र चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पंढरपूर शहर आणि तालुक्यात होत असलेल्या चोऱ्या काही केल्या कमी होताना दिसत नाहीत त्यामुळे नागरिक आणि भाविकांची मालमत्ता धोक्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !