अजित पवारांच्या गटात जाऊन कॅबिनेट मंत्री झालेल्या छगन भुजबळांबद्दल, राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांनी नवा राजकीय बॉम्ब टाकला. छगन भुजबळ जेव्हा तुरुंगात होते, तेव्हा ते शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे आणि आम्ही ते पाहिलं आहे', असा मोठा दावा रमेश कदमांनी केला आहे.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर माजी आमदार रमेश कदम राजकारणात सक्रिय झाले आहेत. पंढरपूर येथे रमेश कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी छगन भुजबळ आणि मी काही एकत्रच तुरुंगात होतो, अशी माहिती दिली.
‘तुरुंगातील छगन भुजबळ आणि आताच भुजबळ यात काय फरक आहे?’, असा प्रश्न रमेश कदम यांना विचारण्यात आला. त्यावर माजी आमदार कदम म्हणाले, “तुरुंगातील छगन भुजबळ हे रोज आजारी पडायचे. काकुळतीला यायचे. त्यांना रोजच उपचाराची गरज पडायची. आताचे भुजबळ खूपच फीट आहेत.”आता आम्ही कधी अशी बातमी ऐकली नाही की, त्यांच्या छातीत दुखतंय. त्यांचा पाय सुजलाय. त्यांना खांद्याचा त्रास झालाय किंवा आणखी काही त्रास झालाय. तुरुंग कुणाच्या नशिबात येऊ नये. तो नरक आहे. पण, त्याठिकाणी गेल्यानंतरच्या क्लुप्त्या लोकांना माहिती आहे. तिथे गेल्यानंतर आठ दिवसात लोक आजारी पडतात. बरंच काही होतं. ते कारण दाखवून ते लोकांची, नेत्यांची, (Chhagan Bhujbal was blackmailing Sharad Pawar) पक्षाची सहानुभूती मिळवायची आणि बाहेर यायचे, अशा पद्धतीने त्यांनी त्यावेळी ते केलं.”
“त्यावेळी ते शरद पवारांनी मदत केली पाहिजे. मला उशीर होतोय, याबद्दलची नाराजी ते (छगन भुजबळ) बोलून दाखवायचे. जर माझा लवकर जामीन झाला नाही, तर मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल किंवा काहीतरी करावं लागेल अशा पद्धतीची ब्लॅकमेलिंग करताना त्यांना (छगन भुजबळ) आम्ही पाहिलं आहे”, असा दावा रमेश कदम यांनी छगन भुजबळांबद्दल केला आहे. आता छगन भुजबळ यावर काय बोलतात हे महत्वाचे ठरणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !