शोध न्यूज : शरद पवार हे आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवत असल्याचा आरोप अजित पवार गटाने निवडणूक आयोगाच्या सुनावणीत केला आहे तर, शरद पवार यांना पक्षाचे निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत असे शरद पवार गटाकडून सांगण्यात आले.
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर आता राष्ट्रवादी पक्ष कुणाचा ? यावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. आजच्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले होते. आजच्या सुनावणीत दोन्ही गटांनी आपली बाजू मजबूतपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह याबाबतची ही सुनावणी असल्याने दोन्ही गटासाठी ही सुनावणी अत्यंत महत्वाची आहे. एका गटाचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे आहे तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व अजित पवार करीत आहेत. राष्ट्रवादीमधून फुटून बाहेर पडल्यानंतर अजित पवार यांनीच निवडणूक आयोगाकडे दाद मागितली असून राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हावर तसेच पक्षावर देखील दावा केला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर देखील हे सगळे घडले होते आणि फुटीर गटाला पक्षचिन्ह आणि नाव देखील मिळाले होते. त्याच धर्तीवर अजित पवार गटाने प्रयत्न सुरु ठेवले आहेत. शरद पवार गट देखील निवडणूक आयोगात गेला आहे.
आजच्या सुनावणीत दोन्ही गटांनी आपली बाजू मांडली. यावेळी, शरद पवार हे आपल्याच मर्जीने पक्ष चालवतात असा आरोप अजित पावर गटाकडून करण्यात आला तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नियुक्ती ही कार्यकारिणी बैठक होण्याआधी करण्यात आली होती असे देखील आयोगापुढे मांडण्यात आले आहे. विशेष म्हणजे अजित पवार गटाने, आपल्याकडे असलेले संख्याबळ मांडले आहे. एकूण ५३ आमदारांपैकी ४३ आमदार आपल्याकडे आहेत तर लोकसभेतील ५ पैकी १ खासदार आणि राज्य सभेतील ४ पैकी १ खासदार आपल्या गटात आहे, शिवाय विधान परिषदेतील ९ पैकी ६ आमदार देखील आपल्या गातात असल्याचा दावा अजित पवार गटाने आयोगासमोर केला आहे. राष्ट्रवादीच्या ९ आमदारावर कारवाई करण्याची मागणी शरद पवार यांनी केली आहे पण हे पत्र बेकायदेशीर आहे, पक्षातील नियुक्त्या या शरद पवार यांच्या एका पत्राने होतात त्यामुळे हा मनमानी कारभार असून लोकशाहीला धरून नाही असे देखील अजित पवार गटाने म्हटले आहे.
शरद पवार यांच्या गटाने देखील आपली बाजू भक्कमपणे मांडली आहे , अजित पावर गटाने पक्षाची घटना पाळलेली नाही शिवाय त्यांची भूमिका पक्षाच्या विचाराच्या विरोधात आहे. राजकीय पक्ष चालवत असताना, घटनेनुसार नियुक्त्या व्हाव्या लागतात, (Ajit Pawar group objected to Sharad Pawar) पक्षाने अजित पवार तसेच एकूण ९ आमदारावर कारवाई करण्याची मागणी एका पत्राने केलेली असून तसे पत्र अध्यक्षांकडे देण्यात आले आहे. शिवाय पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी ही आमच्याच बाजूने असल्यचे देखील यावेळी युक्तिवाद करताना वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले आहे.
..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !