BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ ऑक्टो, २०२३

'त्या' वादग्रस्त पोलिसाची अखेर उचलबांगडी ! हप्तेवसुलीची तक्रार

 



मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार दयानंद हेंबाडे हे मासिक हप्ते वसूली करीत असून त्यांना तात्काळ निलंबीत करावे. अन्यथा २ ऑक्टोबरला गांधी जयंती दिवशी अज्ञात ठिकाणी आत्मदहन कण्याचा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनाद्वारे, दामाजीनगर ग्रामपंचायतीचे सदस्य आण्णासो आसबे यांनी देताच, त्या पोलीस हवालदाराची तात्काळ उचलबांगडी सोलापूर पोलीस मुख्यालयात करण्यात आली आहे.


ग्राम पंचायत सदस्य आण्णासो आसबे यांनी गृहमंत्र्यांना याबाबत एक निवेदन दिले असून, स्मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार दयानंद हेंबाडे हे अवैध व्यवसायिकाकडून मंथली वसूली करतात. यामुळे अवैध व्यवसायांना बळ मिळत असल्याने हे व्यवसाय वाढून अनेकांचे संसार रस्त्यावर येवू पाहत आहेत. यापूर्वीही याबाबतची तक्रार करुनही त्याची दखल वरिष्ठांनी घेतली नव्हती. २ ऑक्टोबर गांधी जयंती दिवशी आपण अज्ञात ठिकाणी आत्मदहन करणार असून होणाऱ्या परिणामास संबंधीत पोलीस अधिकारी व तो पोलीस कर्मचारी जबाबदार राहील असा इशारा दिला होता.


 याची दखल जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांनी घेऊन  संबंधित पोलीस हवालदारची मंगळवेढा येथून सोलापूर पोलीस मुख्यालयात तात्काळ उचबांगडी करण्यात आली आहे. कार्यमुक्त केल्याचा अहवाल तात्काळ कार्यालयास सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, त्या कर्मर्चायाची पोलीस मुख्यालयात झालेली बदली प्रशासकीय प्रक्रिया असल्याचे अधिकारी सांगत आहेत तर, ही बदली माझ्याच तक्रारीवरुन झाली असल्याचा दावाही आण्णासो आसबे यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी वसुलदार आणि झिरो यांचे प्रताप पाहायला मिळत असून, यावर द्देखील काही नियंत्रण येतेय काय ? हे आता पहावे लागणर आहे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !