शोध न्यूज : दारूसाठी एका शासकीय सफाई कर्मचाऱ्याने चक्क सरकारी कार्यालयातील फाईल आणि महत्वाची कागदपत्रे रद्दीत विकल्याची मोठी घटना उघडकीस आली आहे. यावरून माणूस दारूसाठी काहीही करू शकतो हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
दारू हे एका असं व्यसन आहे की, एकदा लागले की ते सुटता सुटत नाही म्हणतात. या दारूसाठी मुलगा आईचा जीव घेतो तर बापाच्या डोक्यात दगडही घालतो. असे अनेक प्रकार नेहमी समोर येताना दिसतात. दारू प्यायची तलफ झाली आणि खिशात पैसा नसला की मग, हा तळीराम चोऱ्या देखील करतो. पण एका पट्ठ्याने मात्र भलताच प्रकार केल्याचे समोर आले आहे.
काही सरकारी कर्मचारी लाच घेतात हे सगळ्यांनाच माहित आहे, पगार मोठा असला तरी लाच घेतल्याशिवाय त याचे पोट भरत नाही म्हणे ! आता तर याच्या पुढेही मजल गेली असल्याचे समोर आले आहे. दारूला पैसे नाहीत म्हणून या पट्ठ्याने चक्क सरकारी कार्यालयातील फाईल, आणि अन्य कागदपत्रेच रद्दीत विकली आहेत. आता याला काय म्हणावं ? कानपूर येथील विकास भवनातील मोहन नावाच्या सफाई कर्मचाऱ्याला दारू पिम्यासाठी पैसे हवे होते. त्याच्या खिशांत तर दमडी नव्हती. मग काय ? त्याने सरकारी कार्यालातील फाईल रद्दीत विकल्या. तेवढ्यावर भागत नाही म्हटल्यावर त्याने इतर महत्वाची कागदपत्रही रद्दीत घातली. महत्वाच्या कागदाचे त्यला काय ? त्याला महत्व केवळ दारूचे !
महत्वाच्या फाईलसह त्याने, पेन्शन, कौटुंबिक लाभाचे अर्जांचे बंडल सुद्धा रद्दीला घातले. तो जेंव्हा या फाईल पोत्यात भरीत होता तेंव्हा त्याच्याच अधिकार्याने पाहिले. कार्यालयातील फाईल, अनेक अर्ज गहाळ होत होते पण ते कुठे जातात हे कुणालाच कळत नव्ह्ते. एके दिवशी मात्र त्याचा हा उद्दोग पाहिला गेला. अधिकारी त्याला घेवून रद्दीवाल्याकडे गेले. (Govt file sold as junk for liquor) तेथे चौकशी केली तेंव्हा कार्यालयातील सगळ्या गायब फाईल आणि कागद तेथे सापडले . शेवटी त्याने कबुलीही दिली आणि त्याला निलंबितही करण्यात आले. दारूच्या व्यसनासाठी कोण काय करील हे खरच सांगता येत नाही. मोहनचा प्रकार म्हणजे अगदी कळस झाला हे मात्र खरे !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !