BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ सप्टें, २०२३

वाईट कर्माचे फळ ! चोरी करुन पळाला पण तडफडून मेला !


शोध  न्यूज : 'जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर' असे म्हटले जाते पण त्याचा प्रत्यक्षात अनुभव आला असून, चोरी करून पळून निघालेल्या एका चोराला, विजेचा शॉक बसला आणि तो त्याच घरी तडफडून मेला आहे. या घटनेची मोठी चर्चा देखील सुरु झाली आहे.


केलेल्या पापाचे फळ येथेच भोगावे लागते असे म्हटले जाते, शिवाय ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फळ मिळत असतेच यावर अनेकांचा विश्वास देखील आहे. दिल्लीतील गाजियाबाद येथील घटनेने तर याची प्रचीतीच दिली आहे. चोराने एका घरात चोरी केली आणि तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याला हाय होल्ट असलेला विजेचा धक्का बसला आणि तो जागीच  तडफडून मेला असल्याची एक घटना समोर आली आहे. या घटनेची नागरिकात देखील चर्चा सुरु असून, वाईट कर्माची ही शिक्षा असल्याची लोकांची भावना झाली आहे. 

 

जावेद आपल्या कुटुंबासह बहादूर गड रझैटी येथील शेखपुरा खिजरामधील नियाज वसाहतीत आपल्या कुटुंबासह राहतात. एका कंपनीत ते वाहन चालक म्हणून काम करतात. ते आपल्या कुटुंबासह घरात झोपलेले असताना, त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा बंद होता. सकाळी मात्र त्यांची पत्नी उठली तेंव्हा दरवाजे उघडे असल्याचे दिसले तसेच घरातील समान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. घरातील एकूण परिस्थितीने, रात्री काय घडले असावे याचा अंदाज त्यांच्या पत्नीला आला. पत्नी आपल्या घराचे निरीक्षण करीत छतावर पोहोचली असता, तिला धक्काच बसला. छतावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तिला दिसला. हे चित्र पाहून ती घाबरली आणि धावत खाली येवून तिने आपल्या पतीला उठवले. उठल्यापासूनचा घटनाक्रम तिने आपल्या पतीला सांगितला.ते ऐकून पती जावेद यांची देखील झोप उडाली. तातडीने ते उठले आणि घराच्या छताकडे धावले. छतावर पडलेला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाहून ते देखील घाबरले. त्यांनी शेजाऱ्यांना याची माहिती दिली आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले.


पोलीस घटनास्थळी येताच त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. मृतदेहाची झडती पोलिसांनी घेतली तेंव्हा, त्याच्या खिशात एक ओळखपत्र आढळून आले, त्यावरून त्याची ओळख पटली आणि पोलिसांनी त्याच्या कुटुंबाला देखील याची माहिती कळवली. त्याच्या खिशात चार मोबाइल, घड्याळ, सोनं आणि चांदीचे दागिने सापडले. याशिवाय पंचवीस  हजार रुपये आढळून आले. हा व्यक्ती आधी देखील चोरीच्या प्रकरणात पोलिसांना आढळून आला होता, जावेद यांच्या घराच्या वरच्या बाजूने हाय होल्ट विद्युत प्रवाह असलेल्या तारा गेल्या आहेत. चोरी करून छतावरून पळून जाण्याचा प्रयत्न या चोराने केला पण विजेच्या तारांचा त्याला अंदाज आला नाही. पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याचा स्पर्श विजेच्या तारांना झाला आणि जबर धक्का बसून तो जागीच तडफडून मृत्युमुखी पडला.


या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जावेद यांच्या घराजवळ जमले. चोरी करून पळून जाणाऱ्या चोराचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने, याची एक वेगळीच चर्चा लोकांत सुरु आहे. (He stole and ran away but died due to electric shock) वाईट कर्माचे फळ अशा प्रकारे मिळतेच पण या चोराला जिथल्या तिथेच मोठी शिक्षा मिळाल्याच्या प्रतिक्रिया परिसरातील नागरिक व्यक्त करू लागले आहेत.



  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !