BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० सप्टें, २०२३

आपल्याच मालकीची दुचाकी दिली पेटवून आणि ---




शोध न्यूज : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना आज एका तरुणाने आपलीच दुचाकी पेटवून दिली आणि आपला संताप व्यक्त केला. या घटनेने मात्र पोलिसांची चांगलीच धावाधाव झाल्याचे पाहायला मिळाले.

 

मराठा आरक्षण आणि पोलिसांनी केलेला लाठीचार्ज हे विषय सद्या धगधगते आहेत. जालना जिल्ह्यात अबंड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले असून, बारा दिवस झाले तरी तोडगा निघत नाही, या ठिकाणी पोलिसांनी लाठीहल्ला केल्याने सरकार अडचणीत आले असतानाच, जरांगे पाटील तसूभरही ढळायला तयार नाहीत. सरकारने वेगवेगळ्या प्रकाराने त्यांचे उपोषण संपविण्याचा प्रयत्न केला पण, मराठा समाजासाठी जरांगे पाटील यांनी आपला जीव पणाला लावलेला आहे. मराठा समाजाच्या भावना प्रक्षुब्ध असून, नुकतेच फुलंब्री गावाच्या सरपंचाने आपली चार चाकी कार रस्त्यावर आणून पेटवून दिली होती. पोलिसांच्या लाठीहल्ल्याचा निषेध म्हणून त्यांनी आपल्या गाडीला आग लावली होती. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका तरुणाने आपली दुचाकी जाळून टाकली आहे. 


धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथील मराठा शेतकरी युवक पंकज महादेव बरडे यांनी आपली दुचाकी धाराशिव ते उजनी रस्त्यावर आणली, गाडीवर पेट्रोल टाकून त्याने ती पेटवूनही दिली. यावेळी शेकडो मराठा बांधव एकत्र जमले होते, त्यांनी यावेळी जोरजोरात घोषणा दिल्या आणि सरकारचा निषेध केला . मराठा नेत्यांना लक्ष्य करीतही त्यांनी या नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. (Burned his own bike for Maratha reservation) रस्त्यावर अचानक हे आंदोलन सुरु झाले होते त्यामुळे पोलिसाची पळापळ तर झालीच पण रस्त्यावरील वाहतूक देखील ठप्प झाली. आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस धावत पळत येथे पोहोचले आणि त्यांनीच पेटलेली दुचाकी विझविण्याचा प्रयत्न केला. अशाच प्रकारे आणखी अचानक आंदोलने केली जातील असा इशाराही यावेळी देण्यात आला.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !