BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ सप्टें, २०२३

शरद पवार यांनी टाकला नवा डाव, अजित पवार गटात धाकधूक !


शोध न्यूज : राजकीय डावपेचात सर्वांच्या पुढे असलेल्या शरद पवार यांनी आता एक नवा डाव टाकला असून, बंडखोरी केलेल्या अजित पवार यांच्या आमदारांत मोठी धाकधूक सुरु झाली असून, काही जण परतीच्या वाटेवर असल्याचाही दावा केला जात आहे.


अजित पवार आणि काही आमदारांनी मिळून राष्ट्रवादी फोडली आणि भाजपशी हातमिळवणी केली, महाराष्ट्रात गद्दारांना कधीच स्थान मिळत नाही त्यामुळे, सत्तेत सहभागी झाले असले तरी, आगामी निवडणूक त्यांच्यासाठी कठीण असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीत फुट पडल्यापासून, या फुटीबाबत उलट सुलट चर्चा तर होत आलीच आहे पण, शरद पवार यांच्या भूमिकेविषयी आजही शंका घेतली जात आहे. शरद पवार यांचे राजकीय डाव आजवर कधीच कुणाला कळले नाहीत, त्यामुळे राष्ट्रवादीची फूट ही शरद पवार यांचीच राजकीय खेळी असल्याची शंका अजूनही घेतली जात आहे. त्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या भेटीमुळे अधिकच शंका व्यक्त केल्या गेल्या. पक्ष फोडूनही शरद पवार शांत कसे ? असा सवाल देखील उपस्थित होत राहिला आहे पण आता, शरद पवार यांनी टाकलेल्या नव्या डावामुळे अजित पवार चांगलेच घेरले जाऊ लागले असल्याचे दिसत आहे.


राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आता एक मोठा डाव टाकला आहे, अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना घेरण्याचा पूर्ण प्लान आखण्यात आला आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करण्यासाठी राष्ट्रवादीने विधान परिषद सभापतींकडे अर्ज केल्याने फुटीर आमदारांची धाकधूक वाढली आहे तर अजित पवार मोठ्या कोंडीत सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.  राष्ट्रवादीचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी, फुटीर आमदारांना अपात्र करण्यासाठी विधानपरिषद सभापती यांच्याकडे अर्ज केला आहे.  विधानसभेतील गटनेते आणि  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या आधीच अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या चार आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात अर्ज केलेला आहे, अमोल मिटकरी, अनिकेत तटकरे, सतीश चव्हाण आणि विक्रम काळे या चार आमदारांना अपात्र करावे अशी मागणी जयंत पाटील यांनी केलेली आहे.


वास्तविक अपात्रतेची कारवाई होण्यासाठी एक अर्ज पुरेसा असला तरी, दोन वेगवेगळे अर्ज राष्ट्रवादीकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे यातही राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची काही वेगळीच राजकीय खेळी आहे काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे, या अर्जामुळे मात्र अजित पवार गटात अस्वस्थता असून फुटीर आमदारात धाकधूक वाढलेली आहे. दरम्यान कारवाईचा धसका घेतलेल्या काही आमदारांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधणे सुरु केल्याच्याही बातम्या येऊ लागल्या आहेत. फुटीर आमदार परत आल्यास त्यांच्या अपात्रतेबाबत पुनर्विचार होणार असला तरी, सरकारमध्ये मंत्री झालेल्या ९ जणांच्या बाबतीत राष्ट्रवादी कारवाईबाबत ठाम आहे अशी खात्रीलायक माहिती आहे. शरद पवार यांनी केलेल्या या खेळीमुळे आणि टाकलेल्या नव्या राजकीय डावामुळे फुटीर आमदार कमालीचे अस्वस्थ झाले आहेत तर अजित पवार यांची देखील मोठी कोंडी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.


या सगळ्या हालचाली सुरु असतानाच शरद पवार यांनी काल केलेल्या विधानाने देखील बंडखोर आमदारांचे टेन्शन वाढवले आहे. राष्ट्रवादीत जे झाले ते झाले, आता आम्ही कामाला लागलेलो आहोत. आपल्यातील काही सहकारी शंका उपस्थित करतात आणि गेलेले आमदार परत आले तर काय ? असा सवाल उपस्थित करतात. तुम्ही आता ते डोक्यातून काढून टाका, आपण आता याबाबत निर्णय घेणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. (Sharad Pawar's new political plan, rebel MLAs in tension) एकंदर दोन्ही बाजूनी फुटीर आमदारांचे टेन्शन वाढू लागले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत गेलेले काही आमदार परतीच्या वाटेला लागले असल्याचे देखील समोर येऊ लागले आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !