BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ सप्टें, २०२३

अजितदादांचा विषय निघताच रडल्या सुप्रिया सुळे !





शोध न्यूज : राजकारण आणि खुर्ची किती कठोर असते याचा अनुभव बारामतीचे पवार कुटुंब सद्या घेत असातानाच, अजितदादांचा (Ajit Pawar) विषय निघताच शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यात पाणी तरळले. काही क्षण त्या अत्यंत भाऊक झाल्याचे पाहायला मिळाले.


गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत गढूळ बनले आहे, कधी नव्हे एवढी गद्दारी राजकारणात सुरु झाली आहे आणि सामान्य माणसाला देखील याचा तिरस्कार येऊ लागला आहे. राजकीय व्यक्तीच्या बाबतीत सामान्य माणूससुद्धा अत्यंत संतापाने आणि उद्वेगाने बोलू लागला आहे. कोण कधी कुणाशी बेईमानी करील याचा आजच्या राजकारणात भरवसा राहिलेला नाही. सतरंजी उचलणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला ज्यांनी मोठ्या पदावर नेऊन बसवले, तो देखील आपल्या राजकीय बापाला अक्कल शिकवू लागला आहे. शिवसेनेत जे घडले तेच राष्ट्रवादीत देखील घडले आहे. प्रदीर्घ काळ राजकारणात काम करणाऱ्या शरद पवार यांनी, अनेकांना सन्मानाची पदे दिली, योग्यता नसणाऱ्यालाही मोठा सन्मान मिळवून दिला आणि आज तेच शरद पवार यांचावर टीका करताना दिसतात. पवारांचे काय बरोबर आणि काय चुकीचे हे देखील हे मान्यवर सांगू लागले आहेत. हे पाहून, ऐकून महाराष्ट्र थक्क होत आहेच पण, राजकारण आणि सत्तेच्या खुर्चीसाठी रक्ताची नाती देखील परकी आणि पारखी होत असल्याचे महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. 



शरद पवार यांच्या उतार वयात, त्यांना मोठा धक्का देत राष्ट्रवादीत फूट पाडण्यात आली. पवारांनी कष्टाने उभी केलेली राष्ट्रवादी, ( NCP ) त्यांच्याच जवळच्या लोकांनी फोडून, मोडून काढली. पक्षाच्या विचाराला देखील तिलांजली देत, सत्तेच्या खुर्चीवर जाऊन बसले. आजवर शरद पवार हे आमचे दैवत आहेत म्हणणारे, आता जाहीर सभामधून पवारांना प्रश्न विचारू लागले आहेत. हे नेते तर बाहेरचे आहेत परंतु त्यांच्या रक्ताच्या नात्यातील अजित पवार यांनी देखील शरद पवार (Sharad Pawar)  यांना धक्का दिला. सत्तेच्या खुर्चीने रक्ताच्या नात्याचा रंग बदलला, पण नात्यातील भावनांना देखील मोठी ठेच लागली आहे. या भावना आता खा. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या डोळ्यातून ओघळताना दिसू लागल्या आहेत. 


अजित पवार आणि सुप्रिया सुळे या बहिण भावांच्या नात्यातील गोडवा आणि आपुलकी महाराष्ट्राने अनेकदा पाहिली आहे. शरद पवार यांना धक्का देत अजित पवार यांनी राष्ट्रवादीच फोडली त्यामुळे सुप्रिया सुळे यांना झालेल्या वेदना लपून राहिल्याच नाहीत. राजकारणात नाती अलिप्त झाली पण नात्यात फूट पडली आहे काय ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.   मात्र या नात्यातील भावना सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यातून बाहेर आली असून ओघळणाऱ्या अश्रूंनी मुकेपणानेच बरेच काही सांगितले आहे.  झी मराठी वरील 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाला आजवर अनेकांनी हजेरी लावली आहे. सुप्रिया सुळे देखील या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी गुप्ते यांनी खा. सुप्रिया सुळे यांना काही प्रश्न विचारले पण, अजितदादा पवार यांचा विषय निघताच सुळे यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. हे अश्रू त्यांना लपवताही आले नाहीत.       


या कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी खा. सुप्रिया सुळे यांना एक प्रश्न विचारला. एकवेळ कुटुंबातील माणसं साथ सोडतील पण त्यांच्या आठवणी कधीच साथ सोडत नाहीत. असं म्हणत अवधूत गुप्तेने सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला आणि सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यातून पाणी ओघळू लागले. सुप्रिया सुळे या खंबीर असतात आणि नेहमी हसतमुख असतात. अत्यंत संयमी असलेल्या सुप्रिया सुळे यावेळी मात्र भलत्याच भाऊक झाल्या होत्या. त्यांचे असे रूप महाराष्ट्राने कधीच पहिले नव्हते. या घटनेचा प्रोमो देखील आता सोशल मीडियावरून व्हायरल होऊ लागला आहे. (Supriya Sule cried on topic of Ajitdada pawar ) त्यात दिसणारा खा. सुप्रिया सुळे यांचा भाऊक चेहरा पाहतानाही दु:ख होऊन जाते असा हा प्रसंग आहे. 'झी मराठी' या वाहिनीवर १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ९ वाजता हा एपिसोड दाखवला जाणार आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !