BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ सप्टें, २०२३

तुम्ही काय समजता ? फाडून काढू एकेकाला ! वाघीण गरजली !




 शोध न्यूज : काय समजता तुम्ही, आमच्या नादाला लागू नका,  फाडून काढू एकेकाला ! अशी डरकाळीच आज मनोज जरांगे यांची मुलगी पल्लवी हिने फोडली आणि तिच्या या गर्जनेची चर्चा महाराष्ट्रभर सुरु झाली.


राज्यात मराठा आरक्षण आणि त्यानिमित्ताने जालना जिल्ह्यात झालेला लाठीमार गाजत आहे, मराठा आरक्षणाची मागणी करीत उपोषणाला बसलेले असताना आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु असताना सरकारने अमानुष लाठीमार केल्याचे पडसाद राज्यात उमटत आहे. या लाठीहल्ल्यामुळे हे आंदोलन अधिक उग्र बनले आणि अजूनही शासन सकारात्मक होत नसल्याने मराठा समाजाच्या भावना अधिक प्रक्षुब्ध होत आहे. राज्यभर गावागावात आणि खेड्यापाड्यात आरक्षणाची मागणी करीत, शासनाचा निषेध करण्यात येत आहे. जनभावना संतप्त असल्याने सरकार अडचणीत येवू लागले असून, आगामी निवडणुकीत देखील याचे प्रतिबिंब उमटणार आहे.  शासन अजूनही बैठकावर बैठका घेत आहे आणि उपोषण संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) मात्र आपल्या आंदोलनावर ठाम असून ते तसूभरही इकडे तिकडे होताना दिसत नाहीत त्यामुळे शासनाची कोंडी होऊ लागली आहे. मराठा आंदोलन हे रोज गाजत आहे पण आज मनोज जरांगे यांची छोटी मुलगी पल्लवी हिने मात्र महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.


मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा सोळावा दिवस असल्याने वरचेवर हा विषय तापू लागला आहे, त्यातच पल्लवीने झाडलेल्या शब्दांच्या फैरी राज्यभर घुमताना दिसू लागल्या आहेत. मनोज जरांगे यांची मुलगी पल्लवी हिने आज जोरदार भाषण करून खुले आव्हानच देऊन टाकले आहे. उपोषणाचा आज सोळावा दिवस असून अन्न पाण्याशिवाय आमचा बाप समाजासाठी उपाशी आहे, आरक्षण मिळणे हा तर आमचा हक्क आहे आणि आरक्षण ( Maratha arakshan) तर मिळालेच पाहिजे, आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु असताना या आंदोलनावर लाठीहल्ला केलाच कशासाठी ? असा सवाल तिने आज सरकारला केला आहे. आंदोलन दडपून टाकण्यासाठीच हे सगळे सुरु आहे, पण त्यांना हे शक्य होणार नाही, हे उठणारे आंदोलन नाही, हे आंदोलन सहजासहजी पेटत नाही आणि पेटले तर विझत नाही असा रोखठोक इशाराही या पल्लवीने शासनाला दिला.


एवढ्यावर पल्लवी थांबली नाही तर, तुम्ही मराठ्यांना काय समजता ? वाघाची जात आहे, फाडून काढू एकेकाला. आमच्या मराठ्याच्या नादाला लागायचं नाही, आम्ही मराठे साधेसुधे नाही हो, कुणबी मराठा आहोत आम्ही. आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु असताना, लहान लेकरं, माता माऊली बघत नाही, येथे आणि थेट लाठीहल्ला करता ! कशासाठी ? आम्ही आमच्या हक्कासाठीच आणि शांततेत लढतोय ना ? असा सवाल पल्लवी जरांगे हिने सरकारला केला आहे. माझा हा बाप केवळ चार लेकरांचा बाप नाही, मराठ्याच्या सगळ्या लेकरांचा बाप आहे म्हणूनच तो त्यांच्यासाठी उपाशी तापाशी बसलास आहे असे देखील तिने सांगितले. (Pallavi Jarange's effective speech in the Maratha movement)  तिच्या या भाषणाने मनामनात अंगार फुलला आहे. पल्लवीच्या या भाषणाची चर्चा आज राज्यभर होऊ लागली असून, या आंदोलनाला आणखी बळ देण्याचे काम या भाषणाने केले आहे, अशा प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !