BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ सप्टें, २०२३

हजारो शेतकऱ्यांची नावे वगळणार ! दोन दिवसांची मुदत !

 


शोध न्यूज : दोन दिवसात ई केवायसी आणि आधार प्रमाणीकरण न करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांची नावे पी एम किसान सन्मान योजनेतून वगळण्यात येणार असून त्याची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे. 


पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरु झाल्यानंतर अनेक अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. त्यानंतर या योजनेकडे बारकाईने लक्ष देण्यात येत आहे. अपात्र लोकांची नावे वगळून, पात्र शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अधिकाधिक काळजी घेतली जात आहे. त्यामुळे अनेक अपात्र लोक या योजनेच्या बाहेर गेले आहेत, शिवाय अनेक अपात्र व्यक्तींकडून वसुली देखील करण्यात आली आहे. योग्य लाभार्थ्यापर्यंत ही योजना पोहोचावी यासाठी, ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे तसेच आधार प्रमाणीकरण देखील अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु वेळोवेळी आवाहन करूनही हजारो लाभार्थी अजूनही ई केवायसी आणि आधार प्रमाणीकरण यापासून दूर आहेत. 


यासंदर्भात कृषी विभाग सातत्याने आवाहन करीत आहे तसेच कृषी साहाय्यकामार्फत प्रबोधन करून ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत आवाहन करीत आहे. तरी देखील सोलापूर जिल्ह्यातील हजारो लाभार्थी ही प्रक्रिया पूर्ण करताना दिसत नाहीत. केवळ मोहोळ तालुक्यातील ४ हजार २२० शेतकऱ्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर ४ हजार ७०० शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. त्यामुळे त्यांना किसान योजनेचा लाभ मिळत नाही. सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात असे शेतकरी आहेत त्यामुळे आता त्यांची नावे या योजनेतून वगळली जाणार आहेत,  त्यासंदर्भात प्रक्रिया सुरु झालेली आहे. त्यामुळे आवाह्नाकडे दुर्लक्ष करीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.  


आता केवळ दोन दिवस उरले असून, अनेकदा संधी देवून आणि आवाहन करून देखील ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे या योजनेतून वगळली जाणार आहेत.    येत्या दोन दिवसात ई- केवायसी व आधार प्रमाणीकरण न केल्यास या शेतकऱ्यांची नावे पोर्टल वरून वगळण्यात येणार असून, त्याची प्राथमिक प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे  ई केवायसी आणि आधार प्रमाणीकरण करण्यात यावे यासाठी जून महिन्यापासून कृषी विभाग तसेच इतर विभाग यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत पण त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसून आला नाही. 


शेतकऱ्यांनी केवायसी आणि आधार प्रमाणीकरण प्रक्रिया करण्यासाठी प्रशासकीय विभागाचा अजूनही प्रयत्न सुरु आहे.  (Kisan Samman Yojana, names of farmers will be omitted) ग्रामपंचायत, कृषी विभाग तसेच व्हाट्सअप ग्रुप तयार करून याबाबत प्रबोधन आणि आवाहन करण्यात आलेले आहे. तरी देखील केवायसी आणि आधार प्रमाणीकरण केले जात नाही, त्यामुळे आता हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहेत. येत्या दोन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी असे आवाहन पुन्हा एकदा कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !