BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ सप्टें, २०२३

पुढील तीन दिवस राज्यात कोसळणार मुसळधार !


शोध न्यूज : भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा एक दिलासादायक अंदाज व्यक्त केला असून, पुढील तीन दिवसात राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे डोळे तर पावसाळा सुरु झाल्यापासूनच आभाळाकडे लागले आहेत.


पावसाळा आता अंतिम टप्प्यात आलेला असून, लवकरच न आलेला पाऊस परतीच्या प्रवासाला लागणार आहे. यावर्षी पाऊस रुसला असल्याने नदी, नाले ऐन पावसाळ्यात कोरडे आहेत तर धरणाची परिस्थिती देखील सुखावह नाही, पावसाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून शेतीतील उभे पिके अखेरचा श्वास घेण्याच्या तयारीला लागलेली आहेत. अशा परिस्थितीत हवामानाचे अंदाज दिलासा देत आहेत. त्यामुळे बळीराजाची आशा पुन्हा  पुन्हा  पल्लवित होत आहे. आतुरतेने पावसाची वाट शेतकरी पहात असून, निराशेचे वातावरण असतानाच आता पुन्हा भारतीय हवामान विभागाने नवा अंदाज व्यक्त केला आहे आणि मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.


गायब असलेला पाउस संप्टेंबर महिन्यात पुन्हा परत आला परंतु तो सगळीकडे बरसला नाही, परत आल्याचे समाधानही अधिक काळ टिकले नाही, पण आता पुन्हा आशा बळावली आहे. कृष्ण जन्माष्टमीपासून तीन दिवस सलग पावसाने राज्याच्या बहुतांश भागात हजेरी लावली पण पुन्हा लगेचच त्याने विश्रांती घेतली होती. हा पाऊस आता राज्यात सक्रीय होत असल्याचे हवामान विभागाचे अनुमान आहे.  येत्या तीन दिवसात राज्यात मुसळधार पाऊस होईल असे हवामान विभागाने सांगितले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यासाठी हवामान विभागाने  नांदेड, परभणी, औरंगाबाद, जालना या ४ जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. मुंबई, पुणे, ठाण्यासह २६ जिल्ह्यातही जोरदार पावसाचा इशारा दिला आहे तसेच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.


पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यात जोरदार पाऊस होऊ शकतो असे हवामान विभागाने म्हटले आहे. (Heavy rain for the next three days) हवामान विभागाच्या या अंदाजामुळे मोठा दिलासा लाभला असून, बळीराजा डोळ्यात प्राण आणून आता पावसाची प्रतीक्षा करीत आहे. उरलेले काही दिवस कोरडे गेले तर मात्र भविष्यातील दिवस हे निश्चितपणे नैसर्गिक संकटाचे ठरणार आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !