शोध न्यूज : आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान केले नाहीत तर मतदाराला आर्थिक फटका बसणार असल्याच्या एका बातमीने मोठी खळबळ उडाली असून या बातमीमागचे सत्य आता समोर आले आहे.
अलीकडे कुठल्याही निवडणुकीत मतदान करण्यास लोक राजी नसतात, ग्रामपंचायत निवडणूक वगळता, अन्य कुठल्याही निवडणुकीत होणाऱ्या मतदानाची टक्केवारी नेहमीच कमी असते. त्यात आता महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून जे राजकारण होत आहे, त्याचा मतदारांना तिरस्कार आलेला आहे. याचा परिणाम आगामी निवडणुकांवर अर्थात मतदानावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच मतदार मतदान करण्यास उत्सुक नसतात आणि त्यात राजकारणाची झालेली अवस्था पाहून, सामान्य मतदार देखील संताप व्यक्त करीत आहेत. मतदान कार्ड जाळून टाकण्यापर्यंतची भाषा सामान्य मतदार करीत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत मतदानाचा टक्का नक्की खाली येऊ शकतो अशी परिस्थिती सद्या तरी दिसत आहे. 'आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास' अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. परंतु अशा परिस्थितीत, येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान नाही केले तर बँकेच्या खात्यातून सदर मतदाराचे ३५० रुपये कापण्यात येणार आहेत अशी बातमी आली आणि अनेकांना धक्का बसला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान न केल्यास लोकांना महागात पडू शकते अशी एक बातमी निवडणूक आयोगाचा उल्लेख करीत आणि वृत्तपत्राच्या बातमीचे क्लिपिंग वापरून सोशल मीडियावर झळकत आहे. या बातमीचे अनेक्ना आश्चर्य वाटत आहे तर अनेकजण परस्परांना हे पाठवत आहे. त्यामुळे व्हायरल होण्याचा वेग देखील वाढला आहे. निवडणूक आयोगावर टीका देखील केली जात आहे, विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने यासाठी न्यायालयाकडून परवानगी देखील मिळवली असल्याचे या बातमीत म्हटले गेले आहे. आगामी लोकसभा निवदानुक्त मतदान न करणाऱ्या मतदारांची ओळख आधार कार्डच्या माध्यमातून करण्यात येणार असून, आधारशी लिंक असलेल्या संबंधित बँक खात्यातून या मतदाराचे ३५० रुपये कापून घेतले जाणार आहेत. असे या बातमीत म्हटले गेले आहे.
या बातमीची देशभरात मोठी चर्चा होऊ लागली असल्यामुळे पी आय बी अर्थात प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोने (PIB) या बातमीची सत्यता तपासून या मागचे सत्य कथन केले आहे. या संस्थेच्या म्हणण्यानुसार व्हायरल होत असलेली ही बातमी संपूर्णपणे असत्य आणि खोटी आहे. ' अशा प्रकारच्या खोट्या बातम्या व्हाटस एप ग्रुप आणि सोशल मीडियावरून व्हायरल केल्या जात आहेत हे आमच्या लक्षात आले आहे' असे निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याच्या एकस अकाउंटवर सांगण्यात आले आहे.
सोशल मीडियावरून फिरत असलेली ही बातमी पूर्ण खोटी असल्याचे समोर आले आहे, असा कोणताही निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला नसून 'जबाबदार नागरिक व्हा, मतदान करा ' मात्र मतदानासाठी कोणीही कुणावर दबाव आणू शकत नाही अथवा कुणाला ब्लॅकमेल करू शकत नाही. असे सांगण्यात आले आहे. (If you don't vote, the money will be cut) सोशल मीडिया जसा आधुनिक काळात आवश्यक आणि महत्वाचा ठरत आहे तसा तो अफवा आणि चुकीची माहिती प्रसारणाचे देखील काम करू लागला आहे. कुठल्याची बाबीची शहानिशा करून घेणे हेच यावरील मार्ग आहे. मतदान न केल्याने पैसे कापून घेण्याची बातमी मात्र खोटी असल्याचे समोर आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !