BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ सप्टें, २०२३

सुप्रिया सुळे यांच्या अश्रूवर अजित पवार कठोर !

 


शोध न्यूज : अजित पवार यांचा फोटो पाहताच, खा. सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या पण या भावनिक घटनेवर देखील अजित पवार यांनी मौन बाळगणेच पसंत केले. अजित पवार यांचे हे वागणे अनेकांना खटकून गेले आहे.


झी मराठी वाहिनीच्या 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात अनेक नेते, अभिनेते हजेरी लावतात आणि अवधूत गुप्ते यांच्या प्रश्नांना उत्तरे देत असतात. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे देखील उपस्थित राहिल्या. राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यापासून आणि विशेष म्हणजे आपले भाऊ अजित पवार यांनीच काकाला दगा देत पक्ष फोडल्याने, सुप्रिया सुळे व्यथित आहेत. अजित पवार आणि सुप्रिया सुळे या भाऊबहिणीचे अनेक किस्से चर्चेला असतात. पण सत्तेच्या हव्यासापोटी रक्ताची नाती देखील कशी पारखी होतात, हे राष्ट्रवादीच्या फुटीतून महाराष्ट्राने पाहिले आहे. अत्यंत संयमी असणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कुठलेही आक्रमक विधान, अजित पवार यांच्याबाबत केले नाही, उलट अजित पवार यांनी आपले काका, शरद पवार यांच्याबाबत जाहीर सभेत बोलताना अत्यंत टोकाला जाऊन विधाने केली आहेत.  


या सर्व घटनानंतर पवार कुटुंबात नक्की कसे वातावरण आहे हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. अवधुत गुप्ते यांच्या या कार्यक्रमात मात्र काळजातले मुके शब्द सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यातून बाहेर आले आणि ओघळलेले अश्रू सगळेच काही सांगून गेले. त्यांच्या या अश्रूही चर्चा राज्यभर झाली, अनेकांचे काळीज गलबलले, सत्ता किती क्रूर देखील असू शकते याचा अनुभव महाराष्ट्राने घेतला. गुप्ते यांच्या कार्यक्रमात अजित पवार यांचा फोटो दाखविण्यात आला आणि सुप्रिया सुळे यांचे डोळे वाहू लागले. हे बघून अवधूत गुप्ते म्हणतात, "तुम्ही कार्यक्रमाच्या आधी आम्हाला म्हणाला होता, की मी कोणासमोर भावना उघड करु शकत नाही. पण आता...! ... सुप्रिया सुळे या आपले डोळे पुसत राहिल्या. हे अश्रू एवढ्या अचानक आले की, सुळे यांना ते लपवता देखील आले नाहीत. 


साताऱ्यात शरद पवार नावाचा योद्धा पावसात भिजला आणि राज्यात सत्तांतर झाले, अवघी तरुणाई देखील शरद पवार यांच्या मागे उभी राहिली. सुप्रिया सुळे यांचे अश्रू पाहून राज्यातील अनेक संवेदनशील मनाला देखील पाझर फुटला. मग अजित पवार यांना बहिणीच्या अश्रुबद्धल काय वाटले असेल ? हाच प्रश्न अनेकांना पडला होता. पण अखेर आज त्याचेही उत्तर मिळाले. सत्ता किती नकारात्मक विचारात गुरफटून जाते, रक्ताच्या नात्याला देखील एक खुर्ची कशी परकी करू शकते. याची प्रचीतीच आज महाराष्ट्राला आली आहे. अजित पवार यांच्या समर्थकांना देखील कदाचित हे चुकीचे वाटले असेल पण, सत्तेच्या वलयात अजित पवार यांना याचे काहीच वाटले नसावे काय ?  तुमच्याबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर गुप्ते यांच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे भावनिक झाल्या असा प्रश्न  विचारला असता त्यावर अजित पवार यांनी बोलणं टाळलं आहे.


राजकारण हल्ली केवळ मतलबी झाले आहे, इथे ना कुणा मतदारांची जाणीव ठेवते, ना घेतलेली शपथ कुणाला आठवते.... अत्यंत कठोर आणि निष्ठुर भावनेची किनार राजकारणाला लागली आहे हे आता सगळ्यांनाच मान्य झाले आहे. पण सगळ्यांच्या पलीकडे नातीगोती आणि भावना असतात. (Ajit Pawar's silence on Supriya Sule's tears) आज मात्र राजकारण आणि सत्ता याच्यापुढे रक्ताची नाती देखील शून्य असतात असेच वाटून गेले आहे. सुप्रिया सुळे यांचे अश्रू पाहून महाराष्ट्र हळहळला पण, ज्यांच्यासाठी अश्रू ओघळले, त्यांच्या ओठातून दोन शब्दही आले नाहीत, प्रश्न विचारला तेंव्हा अजित पवार यांनी न बोलणेच अधिक पसंत केले. एरवी भरभरून बोलणारे अजित दादा आज या प्रश्नावर गप्प कसे राहिले ? सत्ता आणि खुर्ची एवढी क्रूर कशी असू शकते ? हा एकाच सवाल महाराष्ट्राच्या मनात उरला आहे आणि याचे उत्तर कुणालाच कुणी देणार नाही, नव्हे देताच येणार नाही.  


 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !