BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ सप्टें, २०२३

सोलापूर - पुणे महामार्गावर गॅस टँकर अपघात !

 



शोध न्यूज : सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर गॅस  टँकर पलटी झाल्याने एकच गोंधळ उडाला पण सुदैवाने या अपघातात अन्य काही अनुचित घडले नाही. 


अपघात आता नित्याचेच झाले असले तरी, गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकरला अपघात होणे म्हणजे एक चिंतेची बाब असते. ज्वालाग्राही पदार्थ असल्यामुळे मोठी अनुचित घटना घडण्याची भीती असते. गॅसगळती होऊन मोठे नुकसान होण्याचीही शक्यता असते. राष्ट्रीय  महामार्गावरून पुण्याकडून सोलापूरकडे निघालेला एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर (एम एच ४६ बीबी ९४३६) अचानक पलटी झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर भिगवणजवळ  भादलवाडी हद्दीत असलेल्या बिल्ट कंपनीच्या समोरच्या बाजूलाच ही घटना घडली. सर्व्हिस रोड आणि मुख्य महामार्ग यांच्या दरम्यान असलेल्या चारीत हा गॅस टँकर पलटी झाला. गॅसची वाहतूक करणारा हा टँकर असल्याने चिंतेची बाब होती परंतु सुदैवाने काहींही अनुचित घडले नाही आणि मोठी दुर्घटना टळली आहे. 


या घटनेची माहिती मिळताच इंदापूर येथील पोलीस मदत केंद्राचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह भिगवण पोलीस तसेच 'एन एच ए आय' चे   सुरक्षा बलाचे जवान, बिल्ट कंपनीची अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. आडवा झालेला गॅस टँकर बाजूला काढण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून काही काळासाठी दोन्ही बाजूची वाहतूक थांबविण्यात आली होती. (Gas tanker accident on Solapur-Pune highway) गॅस टँकर चालक खाजाउद्दिन शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गॅस टँकरची बारकाईने तपासणी करण्यात आली. आणि त्यानंतर सदर गॅस टँकर बाजूला करण्यात आला. गॅसचा टँकर असल्यामुळे विशेष दक्षता घेतली जात होती. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !