BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ सप्टें, २०२३

बायको माहेरी जाताच, नवरोबाचा दुसरा घरोबा !

 






शोध न्यूज : बायको माहेरी गेल्याची संधी साधून नवरोबाने चक्क दुसरा घरोबा केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या एकूण घटनेची चर्चा देखील  सुरु झाली आहे.


मंगळवेढा तालुक्यातील रड्डे येथे राहणाऱ्या प्रियांका प्रदीप पडोळे यांनी याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचा विवाह १७ डिसेंबर २०२०  रोजी प्रदीप पडोळे यांच्यासोबत झाला आहे. प्रदीप हा  प्रियांका यांच्या आत्याचाच मुलगा आहे. हे लग्न झाल्यानंतर प्रियांका या जत तालुक्यातील साळमाळगेवाडी येथे प्रदीप पडोळे याच्यासोबत राहण्यास गेल्या होत्या. लग्न झाल्यापासून पती प्रदीप आपल्याशी कधी बोललेच नाहीत शिवाय भांडणतंटे मात्र करीत होता, एवढेच नव्हे तर त्यांच्यात पती पत्नीचे संबंध कधीही आले नाहीत. लग्नात मानपान केला नाही म्हणून पतीसह सासू सासरे आणि नणंद देखील शिवीगाळ करून मारहाण करीत होती आणि ' तुझ्या बापाकडून पैसे घेवून हे' म्हणत होते. जागा घेण्यासाठी पैसे घेवून ये म्हणून पती प्रदीप याने, जानेवारी २०२२ मध्ये मारहाण केली. यावेळी प्रियांकाच्या डोळ्याला मार लागला होता, त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्याना तेथून मंगळवेढा तालुक्यातील रड्डे येथे आणले होते.


माहेरी आलेल्या प्रियांका यांना समजूत काढून पुन्हा पती, सासू सासरे यांनी साळमाळगेवाडी येथे नेले पण पंधरा दिवसातच पुन्हा पैशासाठी शिवीगाळ आणि मारहाण सुरु झाली. त्यानंतर अनकेदा मारहाण आणि भांडणतंटे झाले. प्रियांका यांच्या वडिलांना देखील मारहाण झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अखेर एकदा तर सोडचिट्ठी दे नाहीतर तुला मारून टाकीन अशी धमकीही देवून निघून गेले होते. २ सप्टेंबर २०२३ रोजी मात्र प्रियांकाचा पती प्रदीप याने दुसरे लग्न केल्याचा एक व्हिडीओ, त्यांच्या नातेवाईकाने प्रियांका यांच्या वडिलांना पाठवला. त्यावेळी आपल्या पतीने आपल्या परस्पर दुसरे लग्न केले असल्याचे प्रियांका यांना समजले.(Second marriage by husband without wife's consent)  प्रियांका यांनी मंगळवेढा येथील समुपदेशन केंद्रात पती, सासू सासरे, नणंद यांच्या विरोधात अर्ज दिला होता पण तेथे प्रदीप हजर झालाच नाही. त्यामुळे अखेर २० वर्षे वयाच्या प्रियांका यांनी मंगळवेढा पोलीस ठाणे गाठले.पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी पती प्रदीप पडोळे , सासू अर्चना बाळासो पडोळे, सासरा बाळासो सिद्धप्पा पडोळे, नणंद प्रतीक्षा बाळासो पडोळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.    




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !