BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ ऑग, २०२२

विनापरवाना मुरूम उत्खनन, ठेकेदारास कोट्यावधींचा दंड !

 





शोध न्यूज : पंढरपूर तालुक्यात विनापरवाना मुरूम उत्खनन आणि वाहतूक केल्याप्रकरणी ठेकेदारास तब्बल साडे नऊ कोटींपेक्षा अधिक रकमेचा दंड आकारण्यात आला असून हा दंड सात दिवसात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत 


वाळूची तस्करी आणि मुरुमाची चोरी सगळीकडे होताना दिसते. अशा चोरीमुळे शासनाचा महसूल बुडत असतो तर ठेकेदार मात्र सरकारी मुरुमावर 'मालामाल' होताना दिसतो. या प्रकारात अनकेदा अधिकारी सामिल असतात पण प्रामाणिक अधिकारी भेटला की ठेकेदारांची पंचाईत होत असते. शिवाय एखादा सामाजिक कार्यकर्ता पाठपुरावा करू लागला की मग संबंधित ठेकेदाराची चौकशीही होते आणि विना परवाना मुरूम उत्खनन आणि वाहतूक केली असेल तर त्याला भला  मोठा दंडही आकाराला जातो. असाच प्रकार पंढरपूर तालुक्यात घडला असून हजारो ब्रास मुरुमाचे उत्खनन करून वाहतूक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अरुण आसबे यांनी या प्रकरणी नेटाने पाठपुरावा केला होता.


मोहोळ- पंढरपूर-देहू आळंदी या पालखी मार्गाचे काम सुरु असून जे. एम. म्हात्रे कंपनी हे काम करीत आहे. पालखी मार्गाच्या या कामासाठी पंढरपूर तालुक्यातील उपरी, केसकरवाडी, पिराची कुरोली या गावातील मुरूम उचलला आहे. सदर कंपनीने ९ हजार १०० ब्रास मुरूम उत्खनन आणि वाहतूक केली असून यासाठी परवाना घेतला नव्हता. सदर प्रकरणी आसबे यांनी विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर आंदोलन देखील केले होते. पंढरपूर तहसीलदार यांनी सदर कंपनीला 'कारणे दाखवा' नोटीस दिली होती आणि या नोटिशीवर कंपनीने आपले उत्तर देखील सादर केले होते. आता या कंपनीस ९ कोटी ६४ लाख ६१ हजार रुपये दंड जमा करण्याची नोटीस देण्यात आली असून हा दंड सात दिवसात भरण्यात यावा असे आदेश करण्यात आले आहेत. सदर दंडाची रक्कम जमा न केल्यास सात-बारा उताऱ्यावर बोजा चढविण्यात येईल असेही या नोटीसीत म्हटले आहे. 


चौकशीची मागणी 
पंढरपूर तालुक्यातील शेळवे,भंडीशेगाव, वाखरी, मेंढापूर, भटुंबरे, आढीव, देगाव, गुरसाळे, नारायण चिंचोली या गावातून देखील एक लाख ब्रासपेक्षाही अधिक मुरूम विनापरवाना उत्खनन केले असल्याचा आरोप अरुण असावे यांनी केला असून त्याचीही चौकशी कारणांची मागणी करण्यात आली आहे. (
Murum mining without license, contractor fined)  या तक्रारीवरून पंढरपूर तहसिलदार यांनी संबंधित कंपनीला नोटीस बजावली असून प्रशासनाची कारवाई सुरु झाली आहे.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !