BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० जुलै, २०२३

उजनी धरण दोन दिवसात होणार प्लस ! बळीराजा सुखावला !

 



शोध न्यूज : तीन जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेले उजनी धरण दोन दिवसात प्लसमध्ये येण्याचे संकेत मिळत असून पावसाळा अद्याप शिल्लक असल्याने यावर्षी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची आशा निर्माण झाली आहे. 


यावर्षी पावसाने भलतीच ओढ दिली आणि उजनी धरण रिकामे झालेले होते त्यामुळे चिंतेचा विषय बनला होता परंतु भीमा खोऱ्यात चांगला पाऊस सुरु झाल्याने उजनीसह अन्य धरणांची पातळी देखील झापाट्याने वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत उजनी धरणात विसर्ग येत आहे. खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले असून उजनी धरणात विसर्ग सुरु आहे. उजनी धरण दोन दिवसात प्लसमध्ये येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. येत्या मंगळवारी उजनी धरण प्लस होईल असा विश्वास लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अधिकारी सांगू लागले आहेत त्यामुळे आता बळीराजाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. खडकवासला धरण पूर्ण भरले असल्यामुळे या धरणात येणारे पाणी सोडले जात आहे आणि हे पाणी उजनी धरणात येत आहे. पुणे जिल्ह्यातील धरणे भरल्याचा मोठा फायदा उजनी धरणाला होत असतो आणि हा फायदा मिळणे आता सुरु झाले आहे.


ऐन पावसाळ्यात उजनी धरण तहानलेले होते आणि पाणी टंचाईची मोठी भीती निर्माण झाली होती. सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत होती पण आता ही भीती दूर होत आहे. उजनी धरणात ६० टीएमसी पाणी असून अजून पावसाळ्याचे दिवस शिल्लक आहेत त्यामुळे यावर्षी देखील उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता दिसू लागली आहे. (Ujani dam level rising, plus in two days) उजनी धरणात येणारा विसर्ग असाच राहिला तर ही शक्यता सत्यात उतरण्यास वेळ लागणार नाही. अर्धा पावसाळा झाल्यानंतर का होईना पण उजनी धरणाची तहान भागताना दिसत असल्याने तीन जिल्ह्यातील बळीराजा निश्चित सुखावला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !