BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ जुलै, २०२३

पत्नीला विहिरीत बुडवून मारून पतीचीही आत्महत्या !

 


शोध न्यूज : पत्नीला विहिरीत बुडवून मारून टाकले आणि नंतर स्वत: आत्महत्या केल्याची एक धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात घडली आहे. 


सांगोला तालुक्यातील मेटकरवाडी येथील या धक्कादायक प्रकाराने जिल्हा हादरला असून क्रूरतेचा एक वेगळा चेहरा समोर आला आहे. सिद्धराम करंडे हा दारूच्या नशेत असताना त्याने हा प्रकार केला असल्याचे समोर आले आहे. दारूच्या नशेत आणि रागाच्या भरात त्याने हे कृत्य केले. आधी आपल्या पत्नीला विहिरीत ढकलून दिले आणि तिला पाण्यात बुडवून मारले. या प्रकारात नातेवाईकानी तिला वाचविण्याचा प्रयत्नही केला पण कारंडे यांनी पुन्हा तिला पाण्यात ओढून बुडवून मारले. पत्नीला मारल्यानंतर पती सिद्धराम कारंडे याने देखील त्याच विहिरीत आत्महत्या केली आहे. नातेवाईक असलेले नातेवाईक लक्ष्मण बाबू अलदर यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. या घटनेचे ते प्रत्यक्षदर्शी आहेत.


 लक्ष्मण अलदर हे आपल्या घरी असताना त्यांच्या घराजवळून सोनाली सिध्दाराम कारंडे ही विवाहित महिला शेताकडे जाताना त्यांना दिसली, त्या पाठोपाठ या महिलेचा पती  सिध्दाराम कारंडे हा देखील तिच्या मागून शेताकडे गेला. यावेळी तो दारूच्या नशेत होता. या पती पत्नीत काही वाद सुरु असल्याचे लक्ष्मण यांना जाणवले त्यामुळे ते या पती पत्नीकडे गेले. शेतातील विहिरीजवळ त्यांच्यात भांडण सुरु होते. सिद्धराम हा सोनालीला मारहाण करीत होता आणि आता मी तुला जिवंत सोडत नाही असे देखील या भांडणात म्हणत होता. याचवेळी त्याने सोनालीला विहिरीत ढकलून दिले. धावत जाऊन लक्ष्मण यांनी विहिरीत उडी घेतली आणि सोनाली हिला वाचविण्याचा प्रयत्न केला. सोनाली ही जीवाच्या आकांताने ओरडत होती, 'काका, मला वाचवा' म्हणत होती. तिला वाचविण्याचा प्रयत्न केला जात असतानाच सिद्धाराम याने विहिरीत उडी मारली आणि सोनाली चे पाय धरून तिला पुन्हा पाण्यात ओढले, तिला मारहाणही केली.


आपला जीव वाचविण्यासाठी फिर्यादी लक्ष्मण हे बाजूला झाले. या सगळ्या प्रकाराने ते घाबरून गेले होते. मदतीसाठी ते आजूबाजूच्या लोकांना हाका मारत राहिले. काही वेळानंतर भावकीतील काही जण विहिरीवर आले. त्यांनी लक्ष्मण यांना वर घेतले. (The husband also committed suicide by drowning his wife in a well) दरम्यान सोनाली आणि सिद्धराम या दोघांचाही विहिरीच्या पाण्यात मृत्यू झाला होता. या घटनेने अनेकांचा थरकाप उडाला आणि सांगोला तालुका हादरून गेला.    

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !