BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ जुलै, २०२३

राष्टवादी पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला !

 


शोध न्यूज : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर जोरदार हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. 


राज्याच्या राजकरणात आणि राष्ट्रवादी पक्षात जोरदार घडामोडी घडत असतांना ही एक वेगळी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगरमधील सावेडी उप नगरात राष्ट्रवादीचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्यावर हा हल्ला झाला आहे. एकविरा चौकात रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाल्याची माहिती आहे. घातक शस्त्र वापरून चत्तर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून या हल्ल्यात ते जबर जखमी झाले आहेत. उपचारासाठी  त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चत्तर यांच्यावर तीन जणांची अचानक हल्ला चढवला असून या घटनेने खळबळ उडवून दिली आहे. गंभीर जखमी झालेल्या चत्तर यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


हा हल्ला नेमका कशामुळे करण्यात आला आणि तो नेमका कुणी केला हे अद्याप समोर आले नाही परंतु यावेळी जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. घटना घडल्यानंतर पोलिसांनी येथे धाव घेतली असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला तेथून जवळच असलेल्या एका चहा टपरीला आग लावण्याची देखील घटना घडली. तोफखाना पोलीस या दोन्ही घटनेबाबत चौकशी करीत आहेत. (Assault on Nationalist Congress office bearer) राष्ट्रवादी पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्यावरील या हल्ल्याचा निषेध होत असून मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस तपासात काय निष्पन्न होतेय याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !