BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ जुलै, २०२३

एकनाथ शिंदे गद्दार तर अजित पवार .....?



शोध न्यूज : एकनाथ शिंदे गद्दार तर मग अजित पवार कोण ? असा सणसणीत आणि खणखणीत सवाल आता अभिजीत बिचुकले यांनीही उपस्थित केला आहे. हा सवाल जनतेचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांना सोबत घेत शिवसेना फोडली. सत्तेसाठी राज्यात अभूतपूर्व राजकीय भूकंप घडवला गेला शिवाय शिंदे गटावर पन्नास खोक्यांचा आरोप होतच आहे. शिवसेना फोडणाऱ्या चाळीस आमदारांवर प्रचंड रोष असल्याचे राज्यभर दिसत आहे. याचा मोठा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत दिसण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात बंडाळी झाली आणि महाविकास आघाडीला दुसरा धक्का बसला. अजित पवार यांच्या बंडानंतर राजकारण ढवळून निघालं आहे. या बंडावर अनेकांनी उलट सुलट  भाष्य केले आहे. त्यानंतर आता 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांनी प्रतिक्रिया देत चपराक लगावली आहे. जनतेच्या मनातील सवाल त्यांनी विचारला आहे.


राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही असं सांगत एकनाथ शिंदे हे ठाकरे गटातून बाहेर पडले. आता शिंदे कोणाच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत हा माझा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे जर 'गद्दार' आहेत तर अजित पवार  कोण ?  असा जनतेचा सवाल आहे, असे अभिजीत बिचुकले यांनी म्हटले आहे. गद्दार मंडळींनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांना राख फासली आहे. अजित पवार यांच्या भाजप सलगीवेळी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये राष्ट्रवादीच्या घोटाळ्यावर भाष्य केलं होतं. राष्ट्रवादीने घोटाळे केल्याचा आरोप करणारे आता त्यांच्या मांडीला मांडी लाऊन बसतात कसे ? राष्ट्रवादीतील घोटाळ्यावर बोलता मग अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून का बसता? असा रोकठोक आणि सणसणीत सवाल बिचुकले यांनी केला आहे.


अजित पवार आणि अन्य आमदारांनी राष्ट्रवादी फोडली पण यामागे शरद पवार असतील असे आपणांस आजिबात वाटत नाही. शरद पवार यांनी राजीनामा दिला होता तेंव्हा पक्ष कार्यकर्ते विरोध करीत होते पण अजित पवार राजीनाम्याचे समर्थन करीत होते. याचीही आठवण बिचुकले यांनी करुन दिली. सध्याचं महाराष्ट्रातील राजकारण हे तत्त्वहीन आणि दिशाहीन आहे. जनतेच्या आशांना आणि दिशांना धूळ चारणारं हे सध्याचे राजकारण आहे. महाराष्ट्रातील जनतेने यावर विचार करण्याची गरज आहे असे देखील त्यांनी म्हटले आहे.

(Ekanath shinde gaddar ajit pawar abhijit bichukale ) 



 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !