BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ जून, २०२३

नको तो व्हिडीओ केला अपलोड, न्यायालयाने पाठवले खडी फोडायला !




शोध न्यूज : अश्लील व्हिडीओ अपलोड करणे एका तरुणाला भलते महागात पडले असून  न्यायालयाने आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी आणि  फिर्यादीस दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्याला चांगलाच दणका बसला आहे. 


हल्ली प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि सोशल मीडिया आलेला आहे, त्याचा अत्यंत चांगला फायदा देखील झाला आहे परंतु काही जण केवळ याचा दुरुपयोग करण्यात व्यस्त आहेत. अशा मंडळीना यथावकाश का होईना पण कायद्याचा दणका बसतच आहे. तरी देखील काही तरुण सोशल मिडीयाचा चुकीचा वापर करत आहेत. अशाच एका तरुणाला त्याची मस्ती अंगलट आली आणि तीन वर्षांची शिक्षा भोगण्याची वेळ आली आहे. पिडीत युवती बरोबर लुडो गेम यांनी सदर प्रकरणात दोषी धरून तयार करून सदर अश्लील व्हिडिओ हे कॉलेजचे गुगल मॅपवर अपलोड करून गुगल मॅप वर अपलोड करून पीडीतेच्या मनात लज्जा उत्पन्न करणारे गैरकृत्य केले.   इंस्टाग्राम, टेलिग्राम अशा सोशल मीडियावर अपलोड करून पिडीतेची मानहानी करून जाणीवपूर्वक बदनामी केली म्हणून या प्रकरणीअमनदीप करम सिंग (रा. लखना थापापट्टी, तरणतारण पंजाब) याच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी के. बी. सोनवणे यांनी सदर प्रकरणात दोषी धरून त्यास तीन वर्ष सक्तमजुरी, २५ हजार रुपये दंड व नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीस २ लाख रुपये देण्याची शिक्षा ठोठावली आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यास यामुळे आता मोठी धडकी भरली आहे. 


अमनदीप करम सिंग (रा. लखना थापापट्टी, तरणतारण पंजाब) याने पीडित युवतीबरोबर लूडो गेमच्याद्वारे मैत्री करीत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर व्हिडिओ कॉल करून अश्लील व्हिडिओ तयार करून सदर अश्लील व्हिडिओ हे इंस्टाग्राम टेलिग्राम रोप सो व कॉलेजचे गुगल मॅप वर अपलोड करून पीडीतेच्या मनात लज्जा उत्पन्न करणारे गैरकृत्य करत फिर्यादीची सामाजिक मानसिक मानहानी करून जाणीवपूर्वक बदनामी केले प्रकरणी सांगोला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुहास जगताप व पो.ना. ए.एस. मोहोळकर यांनी पूर्ण करून आरोपीविरुद्ध मी न्यायालयात दोषा दोषारोप पत्र दाखल केले. 


या खटल्यात  सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यातील फिर्यादी तपास अंमलदार व सायबर सेलचे पो.कॉ. काकडे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षातर्फे. एस. आर. महाडिक यांनी जोरदार युक्तिवाद करत सध्या समाजामध्ये शालेय आगर कॉलेज युवतीचा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे अशा प्रकारे गैरफायदा घेत त्यांनी सामाजिक व मानसिक हानी पोहोचवून त्याचे सामाजिक कौटुंबिक आयुष्य कशाप्रकारे उध्वस्त केले जाते. ही बाब प्रस्तुत खटल्याच्या अनुषंगाने महत्त्वाची असल्याचे मत मांडले. तसेच भारतीय दंड विधान, माहिती तंत्रज्ञान कायद्यामधील तरतुदीच्या अनुषंगाने आरोपीचे वर्तन हे कायदेशीर रित्या कशा प्रकारे चुकीचे व बेकायदेशीर आहे हे सिद्ध केले. 


अभियोग पक्षाचा सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून सांगोला येथील २ रे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती के. बी. सोनवणे यांनी आरोपीस दोषी धरून भादवि कलम ३५४ मध्ये ३ वर्षे सश्रम कारावास तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ मध्ये ३ वर्ष अशी एकूण तीन वर्षे शिक्षा व २५ हजार रुपये दंडाची व दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने साधा कारावासाची शिक्षा आणि फिर्यादीस २ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची शिक्षा ठेवली आहे. (Uploading offensive video, three years imprisonment) सदर प्रकरणात अभियोग्य तर्फे सहाय्यक सरकारी अभियंता एस. आर. महाडिक, व्ही.जी. साळुंखे यांनी काम पाहिले. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोहेकाँ. पिसे, पो.काँ. शिंदे यांनी प्रत्यक्ष लक्ष घालून काम पाहिले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !