BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ जून, २०२३

चिंता आधीही नव्हती, आता तर मुळीच नाही - कल्याणराव काळे

 


शोध न्यूज : चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची चिंता आधीही नव्हती, आता तर मुळीच नाही, कारण वावटळीत गेलेले देखील आता परत येवू लागले आहेत त्यामुळे चिंता करायची ती आता विरोधक मंडळीनी ! अशा शब्दात चेअरमन कल्याणराव काळे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.


सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत रोजच नाट्यमय घडामोडी घडत आहेत. चंद्रभागा चेअरमन कल्याणराव काळे  आणि विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या जोरदार सामना पाहायला मिळत असताना कल्याणराव काळे हे पाटील यांचे एकेक डाव उलथून लावताना दिसत आहेत. अभिजित पाटील यांच्या गटात प्रवेश होत असल्याचे सतत समोर येत आहे. परंतु हे प्रवेश कसे खोटे आहेत, हे काळे यांनी पत्रकार परिषदेतच दाखवून दिल्याने या प्रवेश प्रकरणांची आता चेष्टा होऊ लागली आहे. त्यातच जे काही अभिजित पाटील यांच्या गटात दाखल झाले होते, ते देखील परतीच्या प्रवासाला लागले असून काही जणांनी पुन्हा आपल्या घरीच येणे पसंत केले आहे त्यामुळे पाटील गटाची अडचण होताना दिसत आहे. काही मंडळी अभिजित पाटील यांच्या गटात  प्रवेश करतात आणि लगेच परत काळे गटाकडे येतात. अत्यंत अल्प काळात ही घरवापसी कशामुळे होतेय ? हा देखील एक प्रश्न आहे.  


मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सहकार शिरोमणीचे निवडणुकीत विरोधी गटाकडून प्रवेशाची स्टाईल सुरू आहे.यामध्ये कोण ? कुठला? याची पर्वा न करता केवळ चुकीच्या पद्धतीने बोलवून त्याचा प्रवेश झाला अशी फुशारकी मिरवली जात आहे. परंतु या तालुक्यातील स्व. वसंतदादा काळे यांनी तयार केलेली निष्ठावंत कार्यकर्त्याची फळी अशी तशी नसून काळे घराण्यावर आज मितीलाही प्रेम करणारी आहे. याबाबत अपणालाही पक्की खात्री आहे.त्यामुळे त्या प्रवेशाचा बार हा फुसका निघाला असून, अमचे वावटळीत अडकून गेलेले काही कार्यकर्ते आता आमच्याकडे घरवापासी करत आहेत.त्यामुळे आम्हाला कसलीही चिंता नाही. असा ठाम विश्वास चेअरमन कल्याणराव काळे यांनी व्यक्त केला आहे.या कारखान्याच्या निवडणूक प्रचार अवघ्या दोन दिवस उरला आहे.यामध्ये आपला भक्कम बालेकिल्ला असलेल्या पिराची कुरोली येथे. मोठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभासद मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चेअरमन काळे यांनी आत्मविश्वासाने मनोगत व्यक्त केले.


सहकार शिरोमणी  कारखाना उभारणीत पिराची गावाचा मोठा हातभार होता. याचीच जाणीव ठेऊन स्व.वसंतदादा यांच्या पासून ते आजपर्यंत या गावाकडे आमचे विशेष लक्ष आहे. या गावातील सर्व ऊस गाळप झाल्याशिवाय आपण बाहेरून ऊस आणला नाही. ही मागील अनेक वर्षांची परंपरा आहे. या ठिकाणी असलेल्या सभासद यांना ऊस गाळप करताना नियम बाजूला ठेऊन , खोडवा,निडवा ऊस गाळपासाठी घेऊन गेलो आहे. या गावातील सभासद संख्या तशी फारच मोठी आहे. याची जाणीव या गावातील सभासद नक्की ठेवणार अशी खात्रीही काळे यांनी व्यक्त केली आहे. या गावचे संचालक बाळासाहेब कौलगे यांना या निवडणुकीतही स्थान देण्यात आले होते . परंतु त्यांनी वावटळीत भूलथापांना बळी पडून दुसरीकडे गेले आहेत. त्याचा या गावातील मतदार सभासदावर फारसा परिणाम होणार नसल्याचेही आवर्जून सांगितले.


 याच कारखान्याच्या मागील निवडणुकीतही दोघांनी दोन पॅनल करून निवडणूक लढविली होती. त्या दोघांनी जीवाचे रान करून अवघी दोन हजार मते मिळवली होती. आता तेच दोघे एकत्रित अजून आमच्याशी निवडणूक लढवीत आहेत.मात्र यावेळी  आमचा स्वाभिमानी मतदार सभासद  वेगळीच अवस्था करून ठेवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यांच्या पॅनलचे नेतृत्व करणारे केवळ विठ्ठलचे निवडणुकीसाठी सांगोला कारखाना घेतला होता. विठ्ठल ताब्यात आल्यावर सांगोला कारखान्याकडे दुर्लक्ष केले. एवढेच नाही तर त्यांनी आपल्या तालुक्यातील केवळ दोन लाख टन ऊस तर बाहेरचा पाच लाख टन ऊस गाळप केला आहे.त्यामुळे आता त्यांची राजनीती कोणत्या दिशेला चालली आहे. याचे आत्मपरीक्षण सर्वांना गरजेचे आहे. त्याची निती आम्ही ओळखली म्हणून आम्ही एकत्रित आलो आहोत. (Kale's faith to win Sahakar Shiromani election) तुम्हीही तुमची भविष्यातील अडचण डोळ्यासमोर ठेऊन,आजवर मी केलेल्या कामाचा विचार करून आमच्या पाठीशी उभा राहावे असे आवाहनही काळे यांनी केले आहे.


विठ्ठलचे निवडणुकीत सुपारी घेऊन केवळ आमच्यात ठिणगी पाडून नामानिराळे राहिलेले, आता आमच्या सगळ्यांच्या विरोधात विरोधकांना साथ देत आहेत. याबाबतही हा विठ्ठल परिवार नक्की दखल घेतल्याशिवाय राहणार नाही.असे म्हणत ऍड दिपक पवार यांच्यावर निशाणा साधला. विठ्ठल ताब्यात घेताच पहिल्याच गाळप हंगामात संचालक यांच्या संपत्तीवर कर्ज काढून त्यांना अडकावून ठेवण्याचे कारस्थान सुरू केले आहे. आपण आजवरती संचालक यांच्या उताऱ्यावर नव्हे तर स्वतःच्या उताऱ्यावर बोजे चढवून कारखाना चालविला आहे. असेही काळे यांनी आवर्जून सांगितले आहे.या निवडणुकीत प्रचार दरम्यान जी गर्दी केली जात होती. ती गर्दी आणि ते लोक नेमके कोण होते. याबाबत मतमोजणी झाल्यावरच सर्वांना समजणार आहे. असेही काळे यांनी सांगितले.या बैठकीत युवराज पाटील, गणेश पाटील,संभाजीराजे शिंदे, सुधाकर कवडे, समाधान फाटे, मारुती जाधव, राहुल कौलगे पाटील आदींनी आपल्या भाषणात सभासदांनी कोणत्याही चुकीच्या वावटळीत अडकून न पडता. आपली निष्ठा काळे यांच्याच पाठीशी उभा राहू द्या असे आवाहन केले आहे.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !