BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ जून, २०२३

पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्याच्या दिंडीत घुसली रिक्षा !

 


शोध न्यूज : आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत एक रिक्षा वेगाने घुसली आणि यामुळे दिंडीत एकच गोंधळ उडाल्याची घटना आज बीड येथे घडली आहे. 


आषाढी एकादशी जवळ आल्याने राज्याच्या विविध भागातून भाविक दिंडी, पालखी घेवून पायी पंढरीकडे निघाले आहेत. वारीला सुरुवात झाली आणि वारकऱ्यांच्या अपघातांच्या बातम्याही सुरु झाल्या. गेल्या तीन चार दिवसात भाविकांचे दोन अपघात समोर आले होते आणि आता पुन्हा एका अपघात घडला आहे. भाविक दिंडी, पालखी घेवून पंढरीकडे पायी चालत निघतात. पायी चालत असतानाही रस्त्यावरील भरधाव वाहने भाविकांना चिरडून टाकतात. दिंडीत भरधाव वाहने घुसल्याने गेल्या वर्षी देखील काही भाविकांचा प्राण गेलेला आहे. यावर काही उपाययोजना तर झाली नाहीच पण यावर्षी देखील भाविकांच्या अपघाताचे सत्र सुरु झाले आहे त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. रस्त्याने जाणाऱ्या दिंडीत भरधाव वेगातील वाहन घुसल्याने होणारा अनर्थ हा मोठाच असतो. आज बीड यथे वेगात आलेली रिक्षा थेट दिंडीत घुसली. रिक्षा होती म्हणून जीवितहानी झाली नाही. परंतु काही वारकरी जखमी झाले आहेत.   


 प्रवाशी वाहतूक करणारा रिक्षा  आणि दुचाकीमध्ये हा भीषण अपघात झाला. हा अपघात होताच रिक्षा बाजूने पंढरपूच्या दिशेने चाललेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत घुसली. यातून झालेल्या या अपघातात भाविक वारकरी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  बीड शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या रिलायन्स पेट्रोल पंपाच्या बाजूला प्रवाशी वाहतूक करणारी रिक्षा आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. या धडकेनंतर रिक्षा बाजूने पंढरपूच्या दिशेने चाललेल्या दिंडीत घुसली. रिक्षा चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने यातील दोन वारकरी गंभीरित्या जखमी झाले. तर संतप्त स्थानिकांनी रिक्षा चालकाला चोप देत रिक्षाची तोडफोड देखील केली. दरम्यान यातील जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. यावेळी स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत वारकऱ्यांना मदत केली आहे.


हरिनामाचा गजर करीत निघालेल्या या दिंडीत अचानक हा प्रकार घडल्याने प्रचंड गोंधळ उडाला. वारकरी घाबरून गेले आणि सैरावैरा झाले. अपघाताची ही घटना घडताच स्थानी नागरिक मदतीला धावले. नागरिकांनी या दिंडीच्या दिशेने धाव घेत रिक्षा चालकाला चांगलाच चोप दिला. त्यानंतर या रिक्षाची तोडफोड देखील करण्यात आली आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही परंतु हा एक मोठा इशाराच आहे.  ( An accident involving a rickshaw entering the devotees' dindi )  रिक्षाऐवजी एखादे जड वाहन असते तर काय घडले असते याचा अंदाज कुणालाही सहजपणे येवून जात आहे. त्यामुळे काही दुर्घटना घडण्याआधीच प्रशासनाने उपाय काढून त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे झाले आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !