BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ जून, २०२३

निवडणूक अधिकाऱ्यांवर नेत्यांनी उधळल्या नोटा !

 



शोध न्यूज : अलीकडे नोटा उधळण्याचे सत्रच सुरु झाले असल्याचे दिसत असून आता तर निवडणुकीत अधिकाऱ्याने पैसे घेतल्याचा आरोप करीत नेत्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अंगावर नोटांची उधळण केली.


शासकीय यंत्रणेत खाबुगिरी काही नवी नाही, लाचखोरीचे प्रकार तर रोजच घडत असून साहेबापासून शिपायापर्यंत अनेकजण सतत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकतात. अलीकडेच एका तरुण सरपंचाने गट विकास अधिकारी यांच्यावर लाचखोरीचा आरोप करीत कार्यालयावर नोटांची उधळण केली होती. हा प्रकार राज्यभर चर्चेला आला होता. त्यानंतर देखील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत अधिकाऱ्याने, एका बाजूने निकाल देण्यासाठी लाचेची मागणी केली होती आणि त्यानंतर झालेला गोंधळ राज्यात चर्चिला गेला. लाचखोर अधिकाऱ्याला उघडे पाडण्यासाठी अलीकडे त्यांच्यावर नोटांची उधळण केली जात आहे. या घटना चर्चेत असतानाच पुन्हा नाशिक रोड - देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या निवडणुकीत अशीच घटना समोर आली आहे.  उमेदवारी जाहीर करण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी गौतम बलसाने यांनी पैसे घेऊन ५६ उमेदवारांचे अर्ज बाद केल्याचा आरोप करीत त्यांच्या अंगावर परिवर्तन पॅनलच्या नेत्यांनी नोटांची उधळण केली.


व्यापारी सहकारी बँकेच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तब्बल ५६ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवले, विरोधाकाकडून पैसे घेवून असा निर्णय देण्यात आल्याचा आरोप करून त्याचा निषेध म्हणून हे आंदोलन केल्याची माहिती विरोधी परिवर्तन पॅनलच्या नेत्यांनी दिली आहे. उमेदवारांचे अर्ज केवळ पैसे घेवून अवैध ठरवले असल्याचा जोरदार आरोप निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर करण्यात आला आणि गोंधळ देखील घालण्यात आला. परिवर्तन च्या नेत्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याच कार्यालयात अधिकारी बलसाने यांच्या अंगावर नोटांची उधळण करून निषेध व्यक्त केला. ५६ उमेदवारांचे अर्ज बाद करण्याबाबत बलसाने यांना विचारणा होत होती पण ते कुणालाही दाद देत नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या नेते मंडळीनी थेट त्यांच्या अंगावर नोटा उधळल्या. पैसे घेवून हे अर्ज बाद करण्याचा प्रकार करण्यात आला असल्याचा जोरदार आरोप यावेळी करण्यात येत होता. 


संगीता हेमंत गायकवाड यांच्या अर्जासोबत सर्व कागदपात्रांची पूर्तता करण्यात आली होती तरीही, त्यांचा अर्ज बाद केला. या बाबत आपण जाब विचारण्यासाठी आलो असता, अवैध ठरवलेला अर्ज पुन्हा वैध ठरविला आणि निवडणूक लढविण्यास पात्र असल्याचे याच अधिकाऱ्याने सांगितल्याने संगीता गायकवाड यांचे पती हेमंत गायकवाड यांनी सांगितले. अधिकारी बलसाने यांचे साटेलोटे असून निवडणूक निर्णय अधिकारीच जर अशा प्रकारे एकांगी वागू लागले तर निवडणूक घेताच कशाला ? (Leaders threw notes at election officials) असा सवाल देखील यावेळी अनेकांनी उपस्थित केला आहे. निवडणुकीत शासकीय यंत्रणाच भ्रष्ट होत असेल तर निपक्षपाती निवडणूक कशी होऊ शकते असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला असून या घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !