शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील आणखी एक लाचखोर महिला सापळ्यात अडकली असून वीस हजारांची लाच घेताना मंडलाधिकारी महिलेस रंगेहात पकडण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागास यश आहे आहे.
लाचखोरीच्या घटना रोजच आणि सगळीकडे घडत असतात. यात महिला लोकसेवक देखील आता मागे राहिल्या नाहीत. पुरुषांच्या बरोबरीने महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत तशा काही महिला लोकसेवक लाचखोरीत देखील पारंगत असल्याचे पाहायला मिळू लागले आहे. आजवर अनेक महिला अधिकारी, कर्मचारी यांच्या हातात बेड्या पडल्या आहेत. आज पुन्हा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील एका महिला मंडलाधिकाऱ्यास वीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या घटनेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. वारस नोंदच्या अनुषंगाने मंडल अधिकारी कार्यालय, उमरड येथील हरकती अर्जावर सुनावणी करून तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्याकरिता २५ हजार रूपये लाचेची मागणी करून २० हजार रूपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली आहे.
तक्रारदार यांनी वारस नोंदच्या अनुषंगाने मंडल अधिकारी कार्यालय, उमरड येथे हरकती अर्ज सादर केला असून या अर्जावर सुनावणी करून तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्याकरिता मंडल अधिकारी शाहिदा काझी यांनी तक्रारदाराकडे २५ हजाराची मागणी केली होती. यात तडजोड होऊन २० हजारावर अंतिम बोलणी झाली होती. यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार दिली. या विभागाने लाच मागणीची पडताळणी केली आणि सापळा लावला. यावेळी ४२ वर्षे वयाच्या शाहिदा युन्नुस काझी या मंडलाधिकारी महिलेने लाचेची रक्कम स्वीकारली. (Women's circle officers caught red-handed while taking bribes) रक्कम स्वीकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून या मंडलाधिकारी काझी यांना ताब्यात घेतले आणि पुढील कार्यवाही सुरु केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !