शोध न्यूज : सोलापुरातील एका कोंबडीने चक्क तीन इंच लांबीचे अंडे दिले असून हे अंडे आणि कोंबडी देखील चर्चेचा विषय ठरली आहे.
कोंबडीने अंडे देणे ही सामान्य बाब आहे परंतु कोंबडीच्या अंड्याचा आकार एक ठराविक असतो. कधी बदल झालाच तर आकार लहान होतो पण सोलापुरात एका कोंबडीने दिलेले अंडे हे सामन्यापेक्षा मोठे असून या अंड्याचा आकार तब्बल तीन इंचाचा आहे. नेहमीपेक्षा वेगळे काही घडले की त्याची चर्चा होत असते त्याप्रमाणे या अंड्याची आणि ते देणाऱ्या कोंबडीची देखील चर्चा सुरु आहे. या चर्चेमुळे कोंबडीचे मालक दशरथ दंदाडे हे देखील आपोआप चर्चेत आले आहेत. सोलापूर - बार्शी रस्त्यावर मेंगाणेनगर येथे दशरथ दंदाडे यांचे घर असून त्यांनी आपल्या घरी काही कोंबड्या पाळल्या आहेत. त्यांच्या एका पाळीव कोंबडीने दिलेले एक अंडे तीन इंच आकाराचे असल्याचे त्यांनी पाहिले आणि प्रथमच एवढे मोठे अंडे पहात असल्यामुळे त्यांना या अंड्याविषयी कुतूहल देखील वाटू लागले.
कोंबडीचे अंडे दीड - पावणे दोन इंचांचे असते एवढेच त्यांना माहित होते. त्यामुळे जवळपास दुप्पट आकाराचे अंडे आपल्या कोंबडीने दिले असल्याचे एक वेगळेच अप्रूप त्यांना वाटून गेले आणि त्यांनी मोठ्या कुतूहलाने आपल्या घरातील इतर सदस्यांनाही हे अंडे दाखवले. आपल्या कोंबडीने एवढे मोठे अंडे कसे काय दिले हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आणि त्यांनी याबाबत एका पोल्ट्री व्यावसायिकाकडे चौकशी केली. आपणही एवढे मोठे अंडे पहिल्यांदाच पहात असल्याचे या व्यावसायिकाने सांगितले आणि त्यांची जिज्ञासा आणखीच वाढू लागली. त्यांनी हे अंडे जपून ठेवण्याचा निर्णय घेतला आणि ते फ्रीजमध्ये ठेवलेही आहे परंतु हाताळताना हे अंडे थोडेसे चिरले गेले आहे, त्यामुळे ते अधिक काळ टिकून राहण्याची शक्यता कमीच आहे.
अंड्यात कधी क्वचित दोन पिवळे बलक असतात त्यामुळे हे अंडे मोठे दिसत असते अशी माहिती पशुधनविकास अधिकारी देऊ लागले आहेत. (A hen laid a three inch egg in Solapur)एकाच अंड्यात दोन बलक असले तरी एक सदृढ आणि दुसरे अशक्त असते. त्यामुळे असे अंडे उबवले तर एकच पिल्लू जन्म घेते किंवा दोन पिले जन्माला आली तरी त्यातील एक किंवा दोन्हीही दगावण्याची शक्यता अधिक असते अशी माहिती देण्यात आली आहे.
(A hen in Solapur has laid a three inch long egg and this egg and the hen have also become a topic of discussion.)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !