BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ मे, २०२३

शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याना एक कोटींची नोटीस !


शोध न्यूज : माफी मागा आणि एक कोटी रुपये जमा करा ! अशी एक मानहानीची नोटीस पंढरपूर तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याना सोनाई दूध डेअरीकडून प्राप्त झाली असून शेतकऱ्यांसाठी केलेले आंदोलन वेगळ्या वळणावर पोहोचले आहे. 


शेतकरी संघटनेने दुधाच्या दराबाबत पंढरपूर तालुक्यात आंदोलन केले होते, या आंदोलनावेळी करण्यात आलेल्या भाषणावर, इंदापूर डेअरी अँड  मिल्क प्रो. लि. चे (सोनाई डेअरी) अध्यक्ष  दशरथ श्रीरंग माने यांनी आक्षेप घेतला आहे आणि वकिलाच्या मार्फत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मानहानीचे नोटीस पाठवली आहे,  रयत कांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष  दिपक जालिंदर भोसले.( सरकोली, पंढरपूर), रयत क्रांती संघटनेचे राहुल मल्लिकार्जुन बिडवे (बोरगाव, माळशिरस ), स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील (आंबे, पंढरपूर) आणि सचिन पांडुरंग आटकळे (कौठाळी, पंढरपूर) याना ही नोटीस देण्यात आली आहे. दुधाचे दर पाडण्यात आले असून यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याबाबत, आणि दर वाढवून मिळणेबाबत शेतकरी संघटनांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या बातम्यातील माहितीच्या आधारे ही नोटीस बजावण्यात आली आहे. (Milk price agitation, demand for one crore compensation)नुकसान भरपाईपोटी एक कोटी रुपयांची मागणी या नोटिशीत करण्यात आली आहे. 


दुधाचे दर पाडण्याचे काम सोनाई चे अध्यक्ष दशरथ माने करत आहेत. एखादया दूध संघाने दुध दर वाढवायचा म्हटले दशरथ माने त्यांना दमदाटी करत आहेत" असा आरोप रयत कांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिपक भोसले यांनी केला असलेची बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली आहे. तसेच" दुधाचे दर पाडण्याचे काम सोनाई चे अध्यक्ष दशरथ माने करत आहेत. जिल्हयात खाजगी दूध संघांनी शेतक-यांना दिवसा लुटण्याचा प्रकार सुरु केला असुन याचे प्रमुख सोनाई दुध संघाचे अध्यक्ष दशरथ माने हे मनमानी पद्धतीने निर्णय शेतक-यांवर लादतआहेत. तसेच दशरथ माने हे दमदाटी करुन दर कमी करा असे सांगत आहेत.असेही एका बातमीत म्हटले आहे.  रयत कांती संघटनेचे पदाधिकारी दिपक भोसले यांनी व त्यांचे बरोबरील आंदोलकांनी केलेले आहे अशी बातमी प्रसिद्ध झालेली आहे. याचाच अर्थ आमचे अशिल हेच सर्वकाही करीत आहेत व दमदाटी करीत आहेत. आमचे अशिलांनी कोणाला दमदाटी केली आहे ही बाब प्रसिद्ध केली नाही. तसेच सदरील बातमीतील कथन कशाचेआधारे केलेले आहे हे सुद्धा तुम्ही लिहीणे  आवश्यक होते. असे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. 


 सोनाई दुध संघाने ऐन उन्हाळयात शेतक-यांच्या टाळूवरचं लोणी खायला सुरुवात केली आहे, दुधाला प्रति लिटर ३ रुपये दर कमी देउन शेतक-यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम केले असुन हा अन्याय आता शेतकरी खपवून घेणार नाही. तसेच दुधाचे टॅकर फोडण्याचा इशारा दिलेला आहे." असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन आटकळे यांनी केला असल्याची बातमीही एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. याचाच अर्थ आमचे अशिल हेच दुध दर कमी करीत आहेत व त्यामुळे आमचे अशिलांनी शेतक-यांचे टाळूवरचे लोणी खाल्ले आहे असे घृणास्पद कथन केलेले आहे. सदरील कथन करणेचा तुम्हास काहीही अधिकार नसताना व तुम्हाला दुधाचे दरासंबंधी काहीही माहीती नसताना तुम्ही आमचे अशिल सोनाई यांचेवर घाणेरडे व बदनामी करणारे आरोप केलेले आहेत. सदरील सर्व आरोप हे खोटे, बिनबुडाचे, प्रतिमा मलीन करणारे व कोणताही पुरावा नसताना केलेले आहेत.  हे माहीती असताना सुद्धा तुम्ही प्रसारमाध्यमांसमक्ष, स्वतःचे प्रसिद्धीसाठी आमचे अशिलांची बदनामी केलेली आहे. सदरील आरोपांमुळे आमचे अशिलांची खुप मोठी हानी होवून नुकसान झालेले आहे.  सर्व आरोप केलेले आरोप तुम्ही आमचे अशिलांवर का व कशाचे आधारे केलेले आहेत? असा सवाल या नोटिशीतून विचारण्यात आला आहे.  


दुधाचे दर कमी करणाऱ्या खाजगी दूध संघाच्या मालकांच्या विरोधात आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील यांनी दिली. जत, आटपाडी तालुक्यातील दुधाचे दर अजूनही ३८ रुपये प्रतिलिटर आहे, फक्त सोनाई दुध, नेचर दुध या संघांनी दर कमी केला असून इतर संघावर दर कमी करण्यासाठी दबाव टाकला आहे असे सचिन पाटील यांनी म्हटले आहे. 


तुम्ही आमचे अशिलांचे विरुद्ध केलेले बदनामी करणेचे बेकायदेशिर कृत्याबाबत तातडीने पत्रकार परिषद घेवून आमचे अशिलांचे विरुद्ध केलेले सर्व आरोप खोटे आहेत व ते कोणत्याही पुरव्याशिवाय केले आहेत असे तातडीने वृत्तपत्रामध्ये व यु टयुबर प्रसिद्ध करावेत. तसेच सोनाई व अध्यक्ष श्री. दशरथ श्रीरंग माने यांची मलीन कलेली प्रतिमा व केलेले सर्व खोटे आरोप याबद्दल जाहीर माफी मागावी व ती प्रसिद्ध करावी. तसेच तुम्ही खोटया बातम्या देवून तुम्ही भरतीय दंड संहीता १९८० कलम ४९९ व ५०० व इंनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट खाली गुन्हा केलेला आहे. त्यामुळे प्रस्तूतची नोटीस ७ दिपवसांच्या मिळताच तुम्ही आमचे अशिल संस्था 'सोनाई' व अध्यक्ष  दशरथ श्रीरंग माने यांची जाहीर लेखी माफी मागावी व ती प्रेस कॉन्फरन्स घेवून मागावी व ती वृत्तपत्रात, युटयुबवर, फेसबुकवर प्रसिद्ध करावी,.तुमचे खोटया व बदनामीकारक कृत्यामुळे आमचे अशिलांचे झालेले गुडविलचे नुकसानीसाठी, प्रत्यक्ष नुकसानीसाठी व होणारे नुकसानीची रक्कम रु १ कोटी तुम्ही सर्वांनी मिळून तातडीने  सोनाई संस्थेमध्ये भरावी व त्याची लेखी पोहोच घ्यावी. असे देखील या नोटिशीत म्हटले आहे. 


कोणतेही कारण नसताना आमचे अशिल श्री. दशरथ श्रीरंग माने यांची बदनामी करुन त्यांचे आयुष्यभर प्रामणीकपने कष्ट करुन मिळवलेली प्रतिष्ठा मलीन केलेबद्दल तुम्ही नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु १ कोटी नोटीस तुम्हास मिळालेपासून १५ दिवसांचे आत जमा करावी व तशी लेखी पोहोच घ्यावी. तसेच तुम्ही सर्वांनी मिळून आमचे अशिलांचे दुधाचे टॅकर फोडण्याचा इशारा दिलेला आहे व तसे तुम्ही कदापी करु नये. परंतू तुम्ही तसे केलेसे तुमचे विरुद्ध कडक कायदेशिर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.असे देखील या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. ही नोटीस शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाली असून, आता शेतकरी संघटना काय पवित्रा घेतात याकडे पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !