सहकार शिरोमणी निवडणुकीत ट्वीस्ट !
शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच क्रूर घटना समोर आली असून, पतीनेच आपल्या पत्नीचा गळा चिरून तिला ठार मारले आणि नंतर स्वत: झाडावर गळफास घेवून आत्महत्या केली आहे.
सात जन्म सोबत करण्याच्या आणाभाका घेवून पती पत्नी नात्याची अजोड गाठ बांधत असतात. पतीच्या वृद्धत्वात पत्नीच आई होऊन पतीची सेवा करीत असते. आयुष्यभर कष्ट सोसत घर उभे करते आणि पतीला सदैव साथ देत राहते. अत्यंत घट्ट विण असलेले हे नाते कधीकधी अत्यंत तकलादू ठरते आणि कधी पत्नी पतीच्या जीवावर उठते तर कधी पती आपल्याच पत्नीचा गळा घोटतो. अशा घटना अधून मधून समोर येत असतातच. आज देखील सोलापूर जिल्ह्यातील मंद्रूप येथून अशीच एक वेदनादायी आणि थरारक घटना समोर आली आहे. या घटनेने अवघा परिसर हादरला आहे. आधी आपल्याच पत्नीचा सत्तूरने गळा चिरला. त्यामुळे पत्नी मृत्युमुखी पडली. यानंतर पतीनेही गळफास घेवून आपले आयुष संपवले.
सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. ६५ वर्षे वयाच्या लाडलेसाब हुसेनी नदाफ या वृद्धाने आपलीच पत्नी नगुमा लाडलेसाब नदाफ (वय ६३) यांचा अमानुष रीतीने जीव घेतला आहे. आधी सत्तूरने पत्नीचा गळा कापून तिचा खून केला, तिच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यात पत्नी नगुमा हिचा मृत्यू झाला. त्यानंतर लाडलेसाब याने आपल्या घराशेजारी असलेल्या झाडाच्या फांदीला गळफास घेवून आत्महत्या केली. ही बाब जेंव्हा उघडकीस आली तेंव्हा मंद्रूप परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पुढील कार्यवाही सुरु केली आहे.
ही घटना कशामुळे घडली हे अजून समोर आलेले नसले तरी, कौटुंबिक वादातून ही हत्या आणि आत्महत्या घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती जशी मिळत गेली तसे लोक घटनास्थळी जमा होऊ लागले.(Husband commits suicide by killing his wife) नंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले असून पुढील अधिक तपास पोलीस करीत आहेत. अत्यंत भयंकर अशा या घटनेने मानवी मन हादरून गेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !