शोध न्यूज : उन्हाळ्यात तापमान वाढत असतानाच आगीच्या घटनातही वाढ होऊ लागली असून सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे मध्यरात्री एका दुकानाला आग लागून तब्बल दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अर्ध्या रात्री ही आग विझविण्यासाठी मोठी धावाधाव करावी लागली.
यावर्षी उन्हाळा भलताच तापू लागला असून वाढत्या उष्णतेने लोक हैराण झालेले आहेत, अशा परिस्थितीत महावितरणचा भोंगळ कारभार अधिकच त्रस्त करीत आहे, त्यातच आगीच्या घटना घडताना दिसू लागल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सोलापुरात आगीच्या मोठ्या घटना समोर आल्या आणि आता सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथेच मध्यरात्री आगीची मोठी घटना घडली आहे. या भीषण आगीने दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. दुकानातील माल देखील नष्ट झाला असून इलेक्ट्रीकल शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. या आगीने व्यापाऱ्याचे तब्बल दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. नुकसानीचा हा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे.
अकलूज येथील बस स्थानकाजवळ असलेल्या मल्हार सिल्क नावाचे साड्या, ड्रेस, कापडाचे मोठे दुकान आहे. या दुकानाला मध्यरात्री अचानक आग लागली असल्याचे समोर आले. अकलूज पोलीस ठाण्याचे काही पोलीस कर्मचारी रात्रीची गस्त घालत असताना, या दुकानातून धूर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी बारकाईने पाहणी केली असता दुकानातून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागल्याचे त्यांना दिसले. पोलिसांनी तातडीने दुकानाचे मालक संगीता गायकवाड आणि शरद गायकवाड यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यासोबतच पोलिसांनी अग्निशामक दलाला फोन करून बोलावून घेण्यात आले. मध्यरात्री लागलेली ही आग अग्निशामक दलाने प्रयत्न करून विझवली परंतु तोपर्यंत दुकाचे मोठे नुकसान झाले होते. दुकान मोठे असल्याने आणि दुकानात विक्रीसाठी असलेला माल देखील मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नुकसान देखील मोठेच झाले आहे. तब्बल दीड कोटी रुपयांचे हे नुकसान असल्याचे सांगितले जात आहे.
रात्रीच्या वेळी आग लागल्याने आगीला भडकत राहण्याची संधी मिळाली. साड्या, ड्रेस, कापड, ब्युटी पार्लर मटेरियल यांच्यासह दुकानातील फर्निचर, टी व्ही, मशिनरी, एयर कंडीशन असे सगळेच साहित्य या आगीत जळून खाक झाले आहे. इलेक्ट्रीकल शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याने प्राथमिक पाहणीत दिसून आले आहे., दुकानातील सगळेच साहित्य जळून खाक झाल्याने दीड कोटी रुपयांची राख झाली असून गायकवाड दाम्पत्यांना हा फार मोठा धक्का बसला आहे. (A fire broke out at a cloth shop in Akluj in the middle of the night.) पोलिसांच्या निदर्शनास ही घटना आली त्यामुळे रात्रीच आग विझविण्यात आली अन्यथा या आगीने आणखी उग्र स्वरूप धारण केले असते. आजूबाजूच्या दुकानांनाही मोठा धोका झाला असता. आग लागल्याचे वेळीच समजले नसल्याने मल्हार सिल्क या दुकानाचे मात्र संपूर्णपणे नुकसान झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !