शोध न्यूज : 'तारीख पे तारीख' असे न्यायालायाबद्धल नेहमी म्हटले जात असले तरी केवळ पंधरा दिवसात निकाल आणि आरोपींना तीस वर्षांची शिक्षा सोलापूर जिल्हा न्यायालयाने सुनावली असून जलद न्यायदानाबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात एका तरुणाचे गुप्तांग कापून त्याचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हा गुन्हा उघडकीस आला तेंव्हा प्रचंड खळबळ उडाली होती. जेवायला जाऊ असे सांगततीन मित्रांनी एका तरुणाला घरातून बोलावून घेण्यात आले होते आणि त्याला दुचाकीवरून नेत निर्जनस्थळी त्याला खाली पडून त्याचे गुप्तांग कापून फेकून देण्यात आले होते. मित्राची रिक्षा बंद पडली आहे, त्याला मदत करू असे म्हणत तरुणाला निर्जनस्थळी नेले होते आणि तेथे त्याला धमकावत आणि तुला जिवंत ठेवत नाही म्हणत त्याला खाली पाडण्यात आले. त्यानंतर ब्लेडच्या मदतीने त्याचे गुप्तांग कापण्यात आले होते. रात्रीची वेळ असल्यामुळे त्याच्या मदतीलाही कुणी येऊ शकले नव्हते. गुप्तांग कापल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन तरुण जागीच बेशुद्ध पडला होता. गुप्तांग कापून तीन मित्रांनी तेथून पळ काढला होता. त्यानंतर काही वेळेने पहाटेच्या सुमारास या तरुणाला शुद्ध आली आणि त्याने रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीच्या मोबाईलवरून आपल्या भावाला या घटनेची माहिती दिली होती.
या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस तसेच स्थानिक पोलीस पाटील घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सदर तरुणाला रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेबाबत पोलिसांनी या तरुणाच्या तीन मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. सदर खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी यांच्यासमोर झाली आणि खदीरसाब उर्फ मुन्ना चाँदसाब पटेल, अ.हमीद उर्फ अमीर नजीर मुल्ला (दोघे रा. मड्डी तडवळगा, ता. इंडी) व हुसेनी नबीलाल जेऊरे-तोंडुंगे (रा. करजगी, ता. अक्कलकोट) या तीन आरोपींना तब्बल ३० वर्षांची शिक्षा, प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड आणि ३० लाख नुकसान भरपाई देण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यात सरकारतर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, पोलीस पाटील, मदत करणारा युवक, डॉक्टर तसेच पोलीस अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली आणि न्यायालयाने तीनही आरोपींना दोषी ठरवले. तीन मित्रांनीच आपल्या मित्राचा खून करण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न केला होता आणि ही घटना उघडकीस आली तेंव्हा सोलापूर जिल्ह्यात विशेषत: अक्कलकोट तालुका आणि इंडी परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
सदर खटल्याचा निकाल अत्यंत जलदगतीने लागला असून १३ फेब्रुवारीला न्यायालयाने या खटल्याची सुनावणी सुरु केली आणि २८ फेब्रुवारीला याचा निकालही लागला आहे. सदर गुन्ह्याचा लवकर निकाल होण्यासाठी न्यायालयाकडे विनंती करण्यात आली होती, एका तरुणाला जीवे ठार मारण्याचा उद्देश होता आणि हे कृत्य अत्यंत निर्घृणपणे करण्यात आले होते याचा विचार करून न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली आहे. (Young man's private parts cut off, three friends sentenced to thirty years) खून करण्याचा प्रयत्न केल्याबद्धल एवढी जबर शिक्षा सुनावण्याची राज्यातील ही पहिली घटना असावी असे सरकारी वकिलांनी सांगितले आहे. पिडीत तरुण हा सामान्य माणसांप्रमाणे जीवन उपभोगू शकत नाही त्यामुळे जखमीला जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्याची मागणी देखील करण्यात आली होती त्यानुसार ३० लाखांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !