BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२८ फेब्रु, २०२३

सोलापुरात तलवारबाजी, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक कोठे यांच्यावर गुन्हा दाखल !

 



शोध न्यूज : हिंदू गर्जना मोर्चात तलवार फिरविल्याच्या प्रकरणी सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे चिरंजीव माजी नगरसेवक प्रथमेश कोठे हे अडचणीत आले असून त्यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे. 


सोलापुरात दोन दिवसांपूर्वी संघ परिवाराच्या वतीने हिंदू गर्जना मोर्चा आयोजित करण्यात आला होता. 'लव्ह जिहाद' आणि 'धर्मांतरविरोधी कायदा व्हावा', गोहत्या बदी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी या व अन्य काही मागण्यांसाठीकाढण्यात आलेल्या 'हिंदू गर्जना मोर्चा' मध्ये शांततेला गालबोट लागून एका धर्मस्थळासह काही दुकानांवर जाणीवपूर्वक पाण्याच्या बाटल्या फेकून दोन धर्मामध्ये शत्रुत्व आणि द्वेषाची भावना वाढविल्याप्रकरणी पोलिसांनी मोर्चा  संयोजकांसह १५-२० व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल केला होता. मोर्चातील काही लोकांनी हुल्लडबाजी करीत धार्मिक स्थळावर पाण्याच्या बाटल्या फेकल्या आणि धार्मिक शत्रुत्व आणि द्वेषाची भावना वाढवून सामाजिक एकोप्याला बाधा निर्माण होण्यासारखे कृत्य केले. त्यानंतरही पुढे गेल्यावर दत्त चौकासह मैदान परिसरात ठराविक दुकानावर बाटल्या फेकल्या गेल्या यात  नामफलकाचे तसेच विजेच्या दिव्यांचे नुकसान झाले. 


मोर्चा आयोजकांनी अनुचित प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेचे होते परंतु तसे घडले नाही म्हणून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात पंधरा ते वीस लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. यात सकल हिंदू समाजाचे समन्वयक अंबादास लक्ष्मण गोरंट्याल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रंगनाथ बंकापूर, पुरूषोत्तम कारकल यांचाही समावेश आहे. या दाखल गुन्ह्याची चर्चा सुरु असतानाच पोलिसांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महापौर महेश कोठे यांचे चिरंजीव आणि माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्याविरोधात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शस्त्रबंदीचे आदेश लागू असताना तालावर बाळगली या आरोपाखाली हा गुन्हा दाखल केला गेला आहे. हिंदू गर्जना मोर्चा माणिक चौकातून जात असताना प्रथमेश कोठे हे या मोर्चात सहभागी झाले आणि यावेळी त्यांच्याजवळ लाल रंगाचे कव्हर असलेली एक तलवार होती. त्यांनी ही तालवार कव्हरच्या बाहेर काढली आणि हवेत फिरवली असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. 


याबाबत पोलीस कर्मचारी विनोद व्हटकर यांनी तशी फिर्याद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली असून त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.( Bare sword! A case has been registered against former NCP corporator Kothe) या घटनेची चर्चा तर सुरु आहेच पण मुळात संघ परिवाराने आयोजित केलेल्या मोर्चात राष्ट्रवादीच्या नेते महेश कोठे आणि त्यांचे पुत्र प्रथमेश कोठे हे कसे काय सहभागी झाले याचीच अधिक चर्चा होऊ लागली आहे. पोलिसांनी मात्र भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ नुसार हा गुन्हा दाखल केला आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !