शोध न्यूज : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा धमकी आल्याने राज्याच्या आणि केंद्राच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली असून त्यांच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली आहे.
सद्याच्या राजकरणात असूनही भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अत्यंत वेगळी प्रतिमा असून राजकारणाच्या दलदलीपासून ते सदैव दूर राहतात. सतत ते आपल्या कामात मग्न असतात आणि विरोधकही त्यांच्यावर टीका करीत नाहीत, उलट सतत त्यांच्या कामाचे कौतुकच करतात. कुणाच्याही आणि कसल्याची फालतू राजकारणात वेळ वाया न घालवता ते काम करीत राहतात त्यामुळे त्याची प्रतिमा अत्यंत स्वच्छ असून पंतप्रधानपदासाठी देखील त्यांच्या नावाची चर्चा जनतेत होत असते. अशा या नितीन गडकरी यांना खंडणी मागण्यात आली असून अशा धमकीचे फोन त्यांच्या नागपूर येथील कार्यालयात आले आहेत. यापूर्वीच म्हणजे १४ जानेवारी रोजी त्यांच्या नागपूर कार्यालयात तीन वेळा धमकीचे फोन आले होते यावेळी गडकरी यांना दाऊदच्या आवाजात जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा त्यांना धमकीचे फोन आले असल्याने अधिक खळबळ उडाली आहे.
आज सकाळी नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात दोन वेळा धमकीचे फोन आले असून हे फोन लँडलाईन क्रमांकावर आले आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी आल्याची माहिती आहे. या धमकी आणि खंडणी प्रकरणी गडकरी यांच्या कार्यालयाने तातडीने नागपूर पोलिसांना माहिती दिली असून पोलीस अलर्ट झाले आहेत. जयेश पुजारी याच्या नावाने हे दोन्ही फोन आले असून याची माहिती मिळताच नागपूर पोलीस गडकरी यांच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. हे फोन खरेच धमकीचे आहे की कुणी खोडसाळपणा केला आहे याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. यापूर्वी आलेले धमकीचे फोन हे बेळगाव येथील तुरुंगातून करण्यात आले होते आणि (Union Minister Nitin Gadkari gets threatening calls for extortion again) आता पुन्हा जयेश पुजारी याच्याच नावाने गडकरी यांना धमकी देण्यात आली आहे. त्यावेळी फोन करणारा हा सराईत गुन्हेगार होता आणि तो बेळगाव येथील तुरुंगात आहे. आज पुन्हा आलेले धमकीचे फोन पोलिसांनी गंभीरपणे घेतले असून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !