शोध न्यूज : कुत्रा चावल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू होण्याची धक्कादायक घटना समोर आली असून कुत्र्यापासूनही सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे या घटनेने दाखवून दिले आहे.
नाक दाबून गुढी उभारा !
नागासारखे विषारी प्राणी चावल्याने मृत्यू ओढवण्याच्या घटना घडत असतात, वेळीच उपचार मिळाले तर विषारी प्राणी चावला तरी वाचण्याची शक्यता असते. कुत्रा हा तसा पाळीव प्राणी असून अत्यंत ईमानदार म्हणून या प्राण्याची ओळख आहे. या प्राण्याला जीव लावला तर तो माणसावर माणसापेक्षाही अधिक प्रेम करीत असतो. त्याला त्रास दिला तर कधी तो चावा देखील घेतो परंतु त्याने दंश केल्यानंतर मृत्यू झाल्याची उदाहरणे आढळून येत नाहीत. पिसाळलेला कुत्रा चावला तर धोका वाढू शकतो परंतु पाळीव आणि सामान्य कुत्र्याच्या दंशाने माणसांचा मृत्यू होणे ही घटना जेवढी दुर्मिळ तितकीच धक्कादायक देखील आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एका तरुणाचा श्वानदंशाने मृत्यू झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी/ नरखेड येथील बिभीषण दशरथ तांदळे या ३१ वर्षीय तरुणाला गावातच एक कुत्रा चावला. कुत्र्याने अचानक त्याच्या डाव्या पायाच्या पिंढरीला चावा घेतला होता. कुत्रा चावण्याची ही घटना पाच दिवसांपूर्वी घडली होती. कुत्र्याने दंश केल्यानंतर त्याच्या विषाचा काही त्रास होऊ नये म्हणून या तरुणाने शासकीय रुग्णालयात जाऊन उपचारही घेतले. त्यानंतर मात्र काल अचानक या तरुणाला त्रास जाणवू लागला. पोट फुगून लघवीचा त्रास होऊ लागला त्यामुळे रात्री तो दवाखान्यात पोहोचला. उपचारासाठी त्याला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले पण अवघ्या दोन तासातच त्याची प्रकृती बिघडली. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यूही झाला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या दोन सव्वा दोन तासात त्याचा मृत्यू ओढवला गेला.
कुत्रा चावल्यामुळे माणसाचा मृत्यू होतो ही दुर्मिळ घटना असून यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. कुत्रा हा माणसाळलेला आणि अत्यंत ईमानदार प्राणी असतो. गावागावात, घराघरात या प्राण्याचा वावर असतो. कित्येकदा त्याला त्रास दिल्यावर अथवा अचानक त्याच्या शरीरावर पाय पडला तर तो चावाही घेतो पण त्याच्या दंशाने मृत्यू झाल्याची घटना ऐकिवात नसते. (A rare case! Youth dies after being bitten by a dog) त्यामुळेच या घटनेबाबत चिंता व्यक्त होत असून परिसरात हळहळ देखील व्यक्त होऊ लागली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !