शोध न्यूज : राज्यातील वाळू चोरांना आता खऱ्या अर्थाने दणका बसणार असून राज्यातील वाळूचे लिलाव बंद करून शासनाकडून अत्यंत स्वस्तात दारात वाळू घरपोहोच केली जाणार आहे.
राज्यभरात वाळूची मागणी सतत वाढत असून यामुळे वाळू चोरांचे फावले आहे. मनमानेल त्या किमतीत वाळूसाठी ग्राहक मिळत असल्यामुळे राज्यात सगळीकडेच वाळू चोरांचा धुमाकूळ सुरु आहे. शासनाची वाळू चोरून अमाप पैसा कमावला जात आहे आणि या पैशावर गुन्हेगारी देखील पोसली जात आहे. वाळू चोरीवर शासनाला आणि प्रशासनाला लगाम लावताच आला नाहीं त्यात प्रशासनातील काही लोकही या साखळीत असल्याचा आरोप सतत होत असतो. वाळूचोरी रोखण्यासाठी सतत कारवाया केल्या जात असल्या तरी वाळू चोरीवर थोडेसेही नियंत्रण आले नसून कुठलीही वाळूचोरी थांबलेली नाही. ग्राहकांची गरज पाहून अत्यंत महागड्या दराने वाळू चोर वाळू विकत असतात त्यामुळे गेल्या काही काळात वाळूच्या किमती सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या असून वाळूला पर्याय शोधला जात आहे. आता मात्र या सगळ्यावर नियंत्रण येण्याची चिन्हे दिसत आहेत.
राज्यातील सगळ्याच जिल्ह्यातील वाळूचे लिलाव बंद करून डेपो योजना सुरु कण्याच्या हालचाली शासनाकडून सुरु झाल्या आहेत. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत विधानसभेतच मोठी माहिती दिली आहे. शासनाच्या या पावलामुळे सर्वसामान्य जनतेला बांधकाम करणे अत्यंत सुलभ होऊन वाळू चोरांना मात्र खऱ्या अर्थाने लगाम लागणार आहे. विशेष म्हणजे चोरट्या बाजारात आठ हजार रुपयांना मिळणारी वाळू शासनाकडून केवळ साडे सहाशे रुपये ब्रास या दराने दिली जाणार आहे त्यामुळे वाळू चोरांचे पाय आपोआप बांधले जाणार आहेत. वाळू चोरीतून आलेली मस्ती आपोआप बंद होणार असल्याने या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत आणि कौतुक होऊ लागले आहे. सामान्य नागरिकांच्या घर बांधणीचे स्वप्नं यामुळे सत्यात उतरण्यास मदत होणार आहे.
नागरिकांना अत्यंत स्वस्त दरात आणि घर पोहोच वाळू उपलब्ध होण्यासाठी शासनाकडून डेपो योजना राबविण्यात येणार आहे. सरकारच्या वतीने हे काम हाती घेण्यात येत असल्याची माहिती महसूलमंत्री विखे पाटील यांनीच विधान सभेत दिली आहे. बेलगाम झालेल्या वाळू चोरांना लगाम घालण्यासाठी हा मार्ग काढण्यात आला आहे. शासनाच्या या धोरणामुळे गरज असलेल्या नागरिकांना स्वस्त दरात वाळू घरपोहोच मिळणार आहे त्यामुळे वाळू चोरांची अवाजवी दरातील महागडी वाळू घेण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही आणि शासनाच्या दरात वाळू विकणे हे चोरांना न परवडणारे आहे त्यामुळे त्यांच्या या अवैध धंद्यांना आपोआप लगाम लागणार आहे. (By closing the auction of sand, the government will provide cheap sand at home) वाळू चोरी बंद होऊन नागरिकांनाही स्वस्त दरातील वाळू उपलब्ध होणार आहे त्यामुळे जनतेतून या योजनेचे स्वागत करण्यात येत आहे.
घरकुलाना दिलासा !
गायरान जमिनीवर बांधण्यात आलेल्या घराकुलाना देखील दिलासा देण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई केली जाणार नसल्याचे महसूल मंत्री यांनी जाहीर केले आहे. गायरान जमिनीवर व्यापार संकुले उभारली आहेत त्यांच्यावर मात्र कारवाई करण्यात येणार आहे. राज्यात शहरी आणि ग्रामीण अशी दोन तहसील कार्यालये सुरु केली जाणार आहेत अशीही माहिती त्यांनी दिली.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !