BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ मार्च, २०२३

उन्हाळ्यात पाऊस आणि गारपीठ ! हवामान विभागाचा मोठा इशारा !!


शोध न्यूज : उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच हवामान विभागाने  मोठा इशारा दिला असून पाऊस आणि गारपीठ होण्याचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 


उन्हाळ्याची सुरुवात होऊन उन्हे तापू लागली आहेत, पहाटे थंडी आणि दुपारनंतर उकाडा असे वातावरण सद्या सुरु असले तरी उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. अजून प्रखर उन्हाळा सुरु झाला नसला तरी येत्या काही दिवसात उन्हाळ्याची तीव्रता वाढणार आहेच परंतु ऐन उन्हाळ्यात पावसाचा आणि गारपीठ होण्याचा मोठा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हा इशारा येताच सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात पावसाने राडा घातला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. यामुळे तर शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीठ मोठा तडाखा देण्याची शक्यता व्यक्त झाली आहे. मागील अतिवृष्टीच्या तडाख्यातून अजून शेतकरी पुरता सावरला नाही तोच उन्हाळा सुरु होताच हा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी शक्य तेवढी दक्षता घेणे आवश्यक बनले आहे. रब्बी हंगामातील पिकांवर हे मोठे संकट आले असून त्यातच गारपीठ होण्याचा इशारा दिला गेल्याने अधिक चिंता व्यक्त होऊ लागली आहे.


येत्या सोमवारी ६ मार्चच्या सायंकाळपासून बुधवारपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त केली गेली असून पुणे, सातारा, अहमदनगर, खान्देश, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, हिंगोली. वाशिम सिन्नर, नाशिक, येवला, नांदगाव, दिंडोरी, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या जिल्ह्यात हा पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पावसासोबत गारपीठ होण्याची शक्यता असल्याचाही अंदाज व्यक्त केला गेला आहे. पावसाचा जोर कमी असला तरी, गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच वाऱ्याचा वेग देखील अधिक असू शकतो असे हवामान तज्ञांनी सांगितले आहे.   वायव्य दिशेने सागराहून बंगालच्या उपसागरात वाहे वाहात असून अरबी समुद्रातून नैऋत्येकडून वायव्य भारताच्या दिशेने सरकणारे पण उत्तर महाराष्ट्राकडे वळणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांचा मिलाफ होण्याची शक्यता असल्याने हा पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 
हवामानाच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांना धडकी भरली असून शेती पिकांचे नुकसान होण्याची मोठी भीती त्यांना वाटू लागली आहे. ऐन उन्हाळ्यात होऊ घातलेला हा पाउस नेमका किती होतो यापेक्षाही पाउस कशा पद्धतीचा होतो यावर पिकांचे नुकसान अवलंबून आहे, तुरळक ठिकाणी गारपीठ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे तसेच पाऊस दोन ते दहा मिमी होण्याची शक्यता असली तरी वारा मात्र ताशी २० ते २५ किमी वेगाने  वाहू शकते असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. (Summer rain and hail! Meteorological department's big warning) पावसापेक्षा हा वेगाने वाहणारा वाराच रब्बी पिके आणि फळबागा यांचे नुकसान करण्याची अधिक शक्यता व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळे शेतकरी धास्तावले असून योग्य काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !