शोध न्यूज : शिमला मिरची घेवून निघालेल्या पिकअप टेंपो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची घटना समोर आली असून रात्री हा अपघात घडला आहे.
शिमला मिरची घेवून एक पिकअप टेंपो अत्यंत भरधाव वेगात लातूरकडे निघाला असताना या वाहनाने एका दुचाकीला उडवले आणि दुचाकीवरून निघालेले चार जण जागीच ठार झाले. जाेडजवळा परिसरात मध्यरात्री हा अपघात झाला आहे. कळंबकडून शिमला मिरची घेवून एक टेंपो लातूरच्या दिशेने निघाला होता तर लातूरकडून कळंबच्या दिशेने चार जण एका दुचाकीवरून निघाले होते. जाेडजवळा गावाजवळ ही दोन्ही वाहने आलेली असताना समोरून अत्यंत भरधाव वेगाने येत असलेल्या पिकअपने दुचाकीला उडवले. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. पिकअप वाहनाने दिलेली धडक एवढी जोरात होती की दुचाकीवरील चौघेही रस्त्याच्या बाजूला वेगाने फेकले गेले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. (Accident in the dark of night, four people died on the spot )अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघातातील टेंपो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून अपघातातील मृतांचे मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठविण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळेस हा अपघात झाला असून अद्याप मृतांची नावे हाती आली नाहीत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !