BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ मार्च, २०२३

सोलापूर - तुळजापूर मार्गावरील अपघातात तीन भाविक तरुण ठार !

 



शोध न्यूज ; सोलापूर - तुळजापूर रस्त्यावर पुन्हा एक भीषण अपघात झाला असून या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तिघे जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.


सोलापूर - तुळजापूर महामार्गावर सतत आणि  मोठे अपघात होत असतानाच आणखी एक अपघाताची  मोठी घटना घडली आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे चास येथील काही तरुण देवदर्शनासाठी निघाले असताना तामलवाडी येथे हा अत्यंत भीषण असा अपघात घडला आणि यात या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तुळजापूरकडे जात असताना धावत्या बोलेरो गाडीचा टायर फुटला आणि गाडी रस्त्याकडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. यात चास या एकाच गावातील तीन तरुणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेने चास गावात शोककळा पसरली आहे.


अत्यंत जिवलग असलेले मित्र देवदर्शनासाठी निघालेले होते परंतु वाटेतच त्यांचा अपघात अंत झाला. या अपघातात निखिल रामदास सानप (24), अनिकेत बाबासाहेब भाबड ( 24 ), अर्थव शशीकांत खैरनार ( 26 ) या तिघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे तर   तुषार दत्तात्रय बिडगर( 24)  दिपक बिडगर ( 27 ) दोघे गंभीर जखमी झाले आहेत  पंकज खैरनार, गणेश खैरनार, जीवन ढाकणे, शंकर भाबड हे मात्र  किरकोळ जखमी झाले आहेत. एकाच गावातील हे सर्व तरुण देवदर्शनासाठी म्हणून गावातून बोलेरो गाडीतून (एमएच १५ इ एक्स ३२११) निघाले होते. पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, अक्कलकोट अशा ठिकाणी जाऊन देवदर्शन घेण्याचे त्यांचे नियोजन होते परंतु तामलवाडी येथेच त्यांना काळाने गाठले. 


अपघात होताच पोलीस घटनास्थळी धावले तसेच परिसरातील नागरिकही तेथे पोहोचले. या सर्वांनी जखमींना तातडीची मदत केली. अपघातात जखमी झालेल्या तरुणांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. (Three young devotees killed in accident on Solapur-Tuljapur road) जखमीतील दोघांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एका जखमीची प्रकृती अगदीच चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. 




.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !