BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ मार्च, २०२३

वाळू चोरांची मुजोरी, धक्काबुक्की करून पळवले ट्रॅक्टर !

 


शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यात वाळू चोरांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली असून महसूल विभागाच्या पथकाला धक्काबुक्की करून वाळू चोरीचे पकडलेले ट्रॅक्टर पळवून नेण्याचा प्रकार घडला आहे.




दुर्गंधीचा सहावा दिवस  !    

✪🅾 🅾 ✪ 🅾️ लक्ष्मी टाकळी उपनगरात प्रभाग ४ मध्ये पुन्हा गटारगंगा ! कुणाला ना खंत, ना खेद ! कान बंद, डोळे बंद !! नागरिकांच्या तक्रारीही गटारीत.. डास आणि दुर्गंधीने नागरिक हैराण ! ✪



वाळूचोर आणि दादागिरी या आता एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. 'चोर तो चोर आणि वर शिरजोर' असा अनुभव नेहमीच येत असतो. वाळूची चोरी करायची आणि कारवाई करण्यासाठी गेलेल्या शासकीय लोकसेवकाच्या अंगावर गाड्या घालणे, त्यांना दमदाटी करणे, मारहाण करणे असे प्रकार नेहमीच घडत असतात. वाळू चोरीची गाडी थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसाच्या अंगावर गाडी घालून त्याचा जीव घेण्याचा प्रकार देखील यापूर्वीच सोलापूर जिल्ह्यातही घडला आहे आणि आता महसूल विभागाच्या पथकास धक्कबुक्की करून कारवाईसाठी चालवलेले ट्रॅक्टर पळवून नेण्याचे धाडस करण्यात आले आहे. हे ट्रॅक्टर  पळवून नेताना पथकास दमदाटी देखील करण्यात आली आहे. वाळू चोरांना ज्यांची भीती असायला हवी त्यांनाच धक्काबुक्की आणि दमदाटी केली जाते यावरून वाळूचोरांचे वाढलेले मनोधैर्य स्पष्ट होत आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील महसूल विभागाच्या पथकास गुड्डेवादी वाळू चोरीबाबत माहिती मिळाली. भीमा नदीच्या पात्रातून काही वाळू चोर वाळूची चोरी करून ट्रॅक्टरमध्ये भरून नेत असल्याची माहिती मिळताच पथकाने भीमा नदीच्या पात्रात धाव घेतली. यावेळी त्यांना काही लोक ट्रॅक्टरमध्ये वाळू भरीत असल्याचे दिसून आले. यावेळी पथकाने त्यांना रोखून त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु केली. त्यासाठी सदर ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले आणि कारवाई करण्यासाठी पथक हे ट्रॅक्टर घेऊन निघाले. यावेळी अक्कलकोट तालुक्यातील कलकर्जाल आणि गुड्डेवाडी येथील चौघांनी या पथकाशी हुज्जत घालत अरेरावी सुरु केली आणि कारवाई करण्यात अडथळा आणला. 


अरेरावी, हुज्जत एवढ्यावर ते थांबले नाहीत तर त्यांनी दमदाटी करीत पथकाला धक्काबुक्की देखील केली आणि कारवाईसाठी चालवलेले ट्रॅक्टर ट्रॉलीसह पळवून नेण्यात आले. याप्रकरणी मंडलाधिकारी मनोज सिद्राम गायकवाड यांनी दक्षिण सोलापूर पोलीस ठाण्यात या चौघांविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी या वाळू चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Bullying of sand thieves, forcefully drove away the tractor) वाळू चोरी नित्याचीच झाली असली तरी वाळू चोरांचे वाढत असलेले मनोधैर्य मात्र अनेकांना धक्कादायक वाटू लागले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !