शोध न्यूज :पंढरीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सजावट करण्यात आलेली एक टन द्राक्ष काही तासात गायब झाल्याच्या घटनेने भाविकांत आणि नागरिकात एकच खळबळ उडाली असून एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक होऊ लागली आहे.
राज्याच्या कोनाकोपऱ्यातून आणि देश विदेशातून मोठ्या प्रमाणत भाविक पंढरीत येत असतात आणि मोठ्या श्रद्धेने विठुमाऊलीचे दर्शन घेत असतात. काही भाविक विठुरायाच्या चरणी मोठ्या देणग्याही देत असतात. काही भाविक विशिष्ठ दिवसाचे निमित्त साधून मंदिरात फळांची, फुलांची आरास देखील करीत असतात. त्यानुसार आज आमलकी एकादशी असल्यामुळे पुणे आणि बारामती येथील भाविकांनी एक टन द्राक्ष वापरून विठ्ठल मंदिरात द्राक्षांची नयनरम्य आरास देखील केली होती. द्राक्षांनी मंदिरात सजावट करण्यात आली होती. परिश्रम करून ही सजावट केलेली असताना काही तासात सजावटीची द्राक्ष गायब झाल्याची बातमी बाहेर आली आणि एकच खळबळ उडाली. या आधी देखील विविध फळाफुलांची आरास करण्यात आली होती परंतु असा प्रकार कधीच घडला नव्हता. आज मात्र काही तासात साजावातीतील द्राक्ष गायब झाली आणि भाविकात खळबळ उडाली. (Pandharpur Vitthal Temple's Decorative Grapes Missing, Excitement and question marks) या प्रकारची माहिती मंदिराच्या बाहेरही आली आणि त्यानंतर स्थानिक नागरिकात देखील खळबळ उडाली असून हा एक चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे याबाबत अधिकृत आणि योग्य स्पष्टीकरण होणे आवश्यक बनले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !