BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ मार्च, २०२३

शेत मोजणीसाठी लाच मागणारा भू करमापक जाळ्यात !

 


शोध न्यूज : शेतजमिनीची मोजणी करण्याप्रकरणी  वीस हजाराची लाच घेणारा भू करमापक लाचलुचपत (Bribe) प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला असून त्याच्याविरुद्ध पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे. 


लाचेचा कॅन्सर शासकीय विभागात मुक्त फैलावला असून साहेबांपासून शिपायापर्यंत आणि ग्रामसेवकापासून कोतवालापर्यंत लाचेचा मोह अनेकांना होत आहे आणि तुरुंगात जाऊन बसत आहेत. शेती मोजणी हा तर शेतकऱ्यापुढील एक बिकट समस्या होत चालली आहे. शेजारी शेतकरी बांध कोरतो आणि जमीन बळकाविण्याचा प्रयत्न करीत असतो. शासकीय मोजणी हा त्यावरील उपाय असला तरी अनेकदा या विभागाची भलतीच मनधरणी करावी लागते. त्यामुळे शासकीय मोजणी आणणे हे देखील शेतकरी बांधवाना त्रासदायक वाटत असल्याच्या तक्रारी शेतकरी करीत असतात. आज मात्र या मोजणीचे दुसरे रूप बाहेर आले असून शेत जमीन मोजणी करण्यासाठी तब्बल २० हजाराची लाच मागितली असल्याप्रकरणी भू करमाफक प्रशांत भारतराव कांबळे याच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

 

सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील वर्ग ३ कर्मचारी प्रशांत कांबळे याने तक्रारदाराकडे शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागितली. रोपळे (क.) येथील गट क्रमांक ५४५ वरील शेतजमीनीची मोजणी झाल्यावर जमीन मोजणी आणि हद्द कायमचा नकाशा वर (क प्रत) उप अधीक्षक यांची सही घेवून देण्यासाठी म्हणून कांबळे याने वीस हजार रुपयांची लाच मागितली असल्याची तक्रार सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. सदर तक्रार १० जानेवारी २०२३ रोजीच प्राप्त झाली असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी केली. (Bribes for agricultural enumeration, land surveyors in trap) सदर पडताळणीत कांबळे याने लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले असून कांबळे याला ताब्यात घेण्यात आले आणि पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !