BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ मार्च, २०२३

पंढरपूर - मंगळवेढा रस्त्यावर आणखी एका तरुणाचा अपघाती मृत्यू !

 



शोध न्यूज : पंढरपूर - गोपाळपूर रस्त्यावर आणखी एका तरुणाचा अपघाती बळी गेला असून बेफिकीर वाहनाने धडक दिलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 


पंढरपूरच्या सर्व दिशेचे रस्ते अपघाताबाबत नेहमीच चर्चेत असून पंढरपूर - सांगोला आणि पंढरपूर - मंगळवेढा या रस्त्यावर तर सतत अपघाताच्या गंभीर घटना घडत आहेत. रस्ते रुंद आणि सिमेंटचे केल्याने वाहनांची चांगली सोय झाली असली तरी या रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांच्या वेगात अमर्याद वाढ झाली आहे. रस्ते रुंद झालेले असतानाही अमर्याद वेगामुळे निरपराध लोकांचे जीव जात आहेत. पंढरपूर - मंगळवेढा रस्त्यावर गोपाळपूर दरम्यान आणखी एका बेपर्वा वाहनाने तरुणाला धडक दिली आणि धडक होताच अंधाराचा फायदा घेत अज्ञात वाहन पळून गेले आणि जखमी झालेल्या तरुणाचाही नंतर उपचार घेताना मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. केवळ दुचाकीतील पेट्रोल संपल्यामुळे या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. 


पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथे राहणारे अनिकेत शरद साळुंखे हे मुळचे बार्शी येथील असून ते एका फायनान्स कंपनीत काम करीत होते. सोमवारी मध्यरात्री ते आपले काम संपवून गोपाळपूर येथे आपल्या घराकडे निघालेले होते. पंढरपूर ते गोपाळपूर अंतर कमी असले तरी मध्येच त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले आणि अर्ध्या रात्री अर्ध्या रस्त्यावर त्यांची दुचाकी बंद पडली. जवळचा पेट्रोल पंप देखील बंद होता त्यामुळे त्यांना दुचाकी ढकलत नेण्याशिवाय पर्याय नव्हता. आपली दुचाकी ढकलत ते घराकडे जात असताना एक भरधाव वेगातील वाहन आले आणि त्यांना जोराची धडक देवून निघूनही गेले. या धडकेत ते जबर जखमी झाले आणि दुचाकीसह रस्त्यावरच पडून राहिले. मध्यरात्र असल्याने त्यांच्या मदतीलाही कुणी आले नाही. दरम्यान सांगोला येथील पोलीस निरीक्षक पाटील हे या मार्गावरून जात असताना त्यांना पडलेली दुचाकी आणि जखमी साळुंके दिसले. त्यांनी थांबून चौकशी करीत जखमीला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.


अर्ध्या रात्री झालेल्या या अपघातामुळे आणि साळुंखे यांना जबर मार लागला असतानाही मदतीसाठी कुणी नव्हते परंतु नंतर थेट पोलीस अधिकारीच तेथे आले त्यामुळे त्यांनी जखमी साळुंखे यांना रुग्णालयात दाखल केले.(Accidental death of another youth on Pandharpur-Mangalvedha road) वेगातील वाहनाने जोराची धडक दिलेली असल्यामुळे तीन वर्षे वयाचे साळुंखे यांना जबर मार लागलेला होता त्यामुळे उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला आह. पंढरपूर - मंगळवेढा रस्त्यावरील अपघाताचा हा आणखी एक बळी ठरला आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !