शोध न्यूज : रंगपंचमीचा आनंद साजरा करीत असतानाच सोलापूर - पुणे महामार्गावर झालेल्या एका अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले तर तीन गंभीररित्या जखमी झाले आहेत.
रंगाचा उत्सव असलेली रंगपंचमी साजरी होत असताना सोलापूर - पुणे महामार्गावर मोठी दुर्घटना घडली आणि भरधाव वेगातील स्विफ्ट कार पलटी होऊन दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगातील या कारने तीन चार पलट्या मारल्या त्यामुळे कारमधील तरुणांना अधिक मार लागला. यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावाच्या परिसरात हा भीषण अपघात घडला. भरधाव कारच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार उलटी पलटी होत राहिली. धावती कार एकदम अनियंत्रित झाल्यामुळे पलटी घेत ती रस्त्याच्या कडेला गेली. पुणे जिल्ह्यातील भिगवण आणि इंदापूर येथील पाच तरुण या कारमधून प्रवास करीत होते. कार अत्यंत वेगात असताना एका वळणावर चालकाला वेगावर नियंत्रण ठेवता आले नाही त्यामुळे अपघाताची ही घटना घडली आणि कार पलटया घेत रस्त्याच्या कडेला गेली. सदर तरुण या कारमधून पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने निघालेले होते. हल्ली प्रत्येकाला घाई असून वेगावर कसलेच नियंत्रण ठेवले जात नाही, अशा अतिवेगाचे हे दोन तरुण बळी ठरले आहेत.
या अपघातात हवेली तालुक्यातील मोशी येथील २२ वर्षाचा तरुण प्रतिक पप्पू गवळी आणि इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी येथील २४ वर्षीय तरुण वैभव विठ्ठल जांभळे हे दोन तरुण जागीच ठार झाले तर असिफ बशीर खान (२२), सुरज राजू शेळके (२३) आणि बाळासाहेब येळे (२३) हे भिगवण येथील तीन तरुण जबर जखमी झाले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेला वैभव विठ्ठल जांभळे हा तरुण टेलरचा व्यवसाय करीत होता तर प्रतिक गवळी हा शिक्षण घेत होता. या दोघांच्या अपघाती मृत्यूने प्रचंड हळहळ व्यक्त होत असून जखमी तरुणाच्या प्रकृतीहीची चिंता व्यक्त केली जात आहे. (Car Accident, Solapur Pune-national-higway two deaths) महामार्गावर वेगाची मर्यादा ठरवून दिली आहे परंतु वाहने ही मर्यादा ओलांडून वेगाने धावतात आणि त्यामुळे अपघाताच्या अशा घटना घडत असतात. अपघात होताच घटनास्थळी अन्य वाहनांची आणि नागरिकांची गर्दी झाली. जखमी झालेल्या तीन तरुणांना तातडीने भिगवण येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या तीन जखमी तरुणांची प्रकृती चिंताजनक आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !