BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ फेब्रु, २०२३

बाप रे ! चार महिन्याचा खानपानाचा खर्च अडीच कोटी !

 


शोध न्यूज : सामान्य शेतकऱ्यांकडे वीज बिल भरायला पैसे नाहीत परंतु राज्यातील जनतेच्या खिशातील अडीच कोटी रुपये वर्षा बंगल्यावर चार महिन्यात खानपानासाठी खर्च झाले असल्याची धक्कादायक माहिती आज राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.


लोकप्रतिनिधी हे जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले असतात आणि शासन हे जनतेच्या खिशातून दिलेल्या पैशाचे विश्वस्त असतात. शासनाचा जो खर्च असतो तो जनतेच्या खिशातून होत असतो त्यामुळे जनतेला याबाबत जाब विचारायचा देखील अधिकार असतो. राज्यात आठ महिन्यांपूर्वी सत्तांतर झाले आणि कधी नव्हे ते एकेक किस्से ऐकायला येत आहेत. आज तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एक माहिती देवून राज्याला धक्का तर दिलाच पण मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासात काय चहात सोन्याचे पाणी टाकून पिले जाते काय ? खाण्यात सोन्याचा वर्ख वापरला जातो काय ? असा सवाल उपस्थित करीत चार महिन्यातील खर्चाची धक्कादायक आकडेवारीच सांगून महाराष्ट्राला एक नवा धक्का दिला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर अजित पवार यांनी फडणवीस - शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला त्यामुळे हे अधिवेशन देखील वादळी होण्याचे संकेत मिळत आहेत. 


सरकारकडून शिंदे गटाच्या आमदारांना पुरविण्यात आलेल्या सुरक्षेवर प्रचंड खर्च होत असल्याचे पवार यांनी आधीच सांगितले होते पण आज वर्षा या मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानात केवळ खानपानावर चार महिन्यात २ कोटी ३८ लाख रुपये खर्च झाले असल्याचे सांगितले आणि एवढे बिल कसे? असा सवाल देखील उपस्थित केला आहे. आपणही उपमुख्यमंत्री होतो, आपले काही सहकारीही मुख्यमंत्री होते. चार महिनात जेवणाचे बिल एवढे येतेच कसे ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला सरकार चहात काय सोन्याचे पाणी, जेवणात सोन्याचा वर्ख टाकते काय ? असा सवाल देखील त्यांनी विचारला. आपले हसरे चेहरे दाखविण्यासाठी सरकारने जाहिरातीवर ५० कोटी रुपये खर्च केले आहेत तर मुंबई महापालिकेचे १७ कोटी जाहिरातीवर खर्च  केले आहेत. शासनाच्या पैशाची अशी उधळपट्टी सुरु आहे तर दुसरीकडे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नाही. महामंडळाच्या जाहिराती मात्र पान पान भरून प्रसिद्ध होत आहेत. हा सगळा प्रकार चीड आणणारा आहे असे देखील पवार संतापाने म्हणाले. 


आठ महिन्यात अपयशी ठरलेल्या या सरकारने शासनच्या तिजोरीचा विचार न करता मंत्री आणि ठराविक आमदार यांच्या मतदार संघात करोडो रुपयांची कामे जाहीर केली जातात परंतु देण्यासाठी तेवढा निधीही नाही त्यामुळे ही शुद्ध फसवणूक असून इतर गोष्टीवरच मोठी उधळपट्टी सुरु आहे. मागे अर्थसंकल्पात मंजूर असलेल्या कामाना स्थगिती दिली जात असून विकास प्रक्रियेला फटका बसला आहे. विकासाची कामे ठप्प झाली असून जिल्हा वार्षिक नियोजनाचे पैसे देखील खर्च झाले नाहीत. (Varsha bungalow, food expenditure crores in four months)निधीचेही वितरण नसून राज्यात कायदा सुव्यवस्था सांभाळली जात नाही. गुन्हेगारी आणि धमक्या वाढलेल्या आहेत याकडेही अजित पवार यांनी लक्ष वेधले आणि सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असल्याची माहिती त्यांनी दिली.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !